Tata Nexon ला टक्कर देणाऱ्या या इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत मोठी घट, फेब्रुवारीत फक्त 83 युनिस्टची झाली विक्री

Citroen e-C3 EV: इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये टाटाला टक्कर देणाऱ्या Citroen eC3 कारच्या विक्रीत मोठी घट झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात कंपनीच्या कारच्या विक्रीचा आकडा पडला आहे.
Citroen e-C3 EV
Citroen e-C3 EV Saam Tv
Published On

Citroen e-C3 EV:

भारतात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी सातत्याने वाढत आहे. देशात इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये टाटाने आपलं स्थान बळकट केलं आहे. इलेक्ट्रिक कारच्या एकूण विक्रीपैकी 75 टक्क्यांपेक्षा जास्त विक्री टाटा मोटर्स करते. Tata Nexon आणि Tiago या कंपनीच्या लोकप्रिय इलेक्ट्रिक कार आहेत. यातच इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये टाटाला टक्कर देणाऱ्या Citroen eC3 कारच्या विक्रीत मोठी घट झाली आहे.

फेब्रुवारी महिन्यात कंपनीच्या कारच्या विक्रीचा आकडा पडला आहे. फेब्रुवारी महिन्यात eC3 ने कारच्या फक्त 83 युनिट्सची विक्री केली आहे. तर फेब्रुवारी 2023 मध्ये हा आकडा 213 युनिट होता.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Citroen e-C3 EV
New EV: फोक्सवॅगनची ही इलेक्ट्रिक कार एका चार्जमध्ये देते 600 किमीची रेंज, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

सिंगल चार्जवर देते 300 km ची रेंज

Citroen eC3 ही 5 सतार इलेक्ट्रिक कार आहे. भारतात ही कार तीन प्रकारात उपलब्ध आहे. Citroen eC3 मध्ये ग्राहकांना 315 लीटर बूट स्पेस आणि 170 mm ग्राउंड क्लिअरन्स मिळतो. (Latest Marathi News)

याच्या पॉवरट्रेनबद्दल बोलायचं झालं तर, यात 29.2 kWh चा बॅटरी पॅक आहे. जो 57bhp पॉवर आणि 143Nm चा पीक टॉर्क जनरेट करतो. एका चार्जवर ही कार 320 किमीची रेंज देते, असा दावा कंपनीचा आहे. याची बॅटरी 15A प्लग पॉइंटने 10.30 तासांत 100 टक्के चार्ज होते.

Citroen e-C3 EV
24GB RAM, 1 TB स्टोरेज; बेस्ट नाही जबरदस्त आहे 'हा' स्मार्टफोन

कारच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, यात ग्राहकांना 10.2-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, मॅन्युअल एसी आणि डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर मिळते, जे Android ऑटो आणि अॅपल कारप्ले कनेक्टिव्हिटीला सपोर्ट करतो. याशिवाय कारच्या केबिनमध्ये कनेक्टेड कार टेक्नॉलॉजीसारखे फीचर्सही देण्यात आले आहेत. Citroen च्या या इलेक्ट्रिक हॅचबॅकची एक्स-शोरूम किंमत 11.61 लाख रुपयांपासून सुरू होते. याच्या टॉप मॉडेलची किंमत 13.35 लाख रुपये इतकी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com