New EV: फोक्सवॅगनची ही इलेक्ट्रिक कार एका चार्जमध्ये देते 600 किमीची रेंज, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Volkswagen ID.3 GTX: फोक्सवॅगनने आपले नवीन मॉडेल ID.3 GTX सादर केले आहे. ही कार दोन वेगवेगळ्या आउटपुट रेंजसह बाजारात आली आहे.
Volkswagen ID.3 GTX
Volkswagen ID.3 GTXSaam Tv
Published On

Volkswagen ID.3 GTX:

फोक्सवॅगनने आपले नवीन मॉडेल ID.3 GTX सादर केले आहे. ही कार दोन वेगवेगळ्या आउटपुट रेंजसह बाजारात आली आहे. ही फोक्सवॅगनची अतिशय पॉवरफुल इलेक्ट्रिक कार असल्याचं बोललं जात आहे. सध्या ही कार भारतात लॉन्च होण्याची शक्यता फार कमी आहे. कंपनी येत्या काळात भारतीय बाजारात ID.4 आणू शकते.

Volkswagen ID.3 GTX मध्ये 79kWh बॅटरी पॅक आहे. ही कार 0 ते 100 किमी प्रतितास 5.6 सेकंदात वेग घेऊ शकते. ही इलेक्ट्रिककार 545Nm आउटपुट टॉर्क देते. ही कार एका चार्जमध्ये 600 किलोमीटरपर्यंत धावू शकते, असा दावा कंपनीने केला आहे. तसेच या कराची बॅटरी 26 मिनिटांत 10 ते 80 टक्के चार्ज होऊ शकते. फोक्सवॅगनच्या या मॉडेलमध्ये 79kWh लिथियम आयन बॅटरी आहे. जी 175kW DC क्विक चार्जिंग स्टेशनवरून चार्ज केली जाऊ शकते. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Volkswagen ID.3 GTX
24GB RAM, 1 TB स्टोरेज; बेस्ट नाही जबरदस्त आहे 'हा' स्मार्टफोन

फोक्सवॅगनचे हे मॉडेल त्याच्या बाहेरील डिझाइनच्या बाबतीत बाजारात उपलब्ध असलेल्या इतर मॉडेलपेक्षा वेगळे आहे. या कारच्या पुढील बंपरमध्ये डायमंड स्टाईल ब्लॅक एअर इनटेक देण्यात आले आहे. फोक्सवॅगनच्या या मॉडेलमध्ये दोन्ही बाजूंना डे टाईम रनिंग लाइट्सही देण्यात आली आहे.  (Latest Marathi News)

Volkswagen ID.3 GTX मध्ये 20-इंचाचे व्हील्स देण्यात आले आहे. GTX स्टाईल याच्या व्हिल्सवरतीही दिसून येते. याच्या व्हील्सला आतील बाजूने ब्लॅक रंग देण्यात आला आहे. तर बाहेरील बाजूने यात डायमंड कट लावले गेले आहेत. या कारची इंटिरिअर डिझाईनही खूपच जबरदस्त आहे. फोक्सवॅगन मॉडेल्समध्ये प्रीमियम स्पोर्ट सीट्स देण्यात आल्या आहेत. याच्या सीटवर लाल रंगाची डेकोरेटिव्ह स्टिचिंगही करण्यात आली आहे.

Volkswagen ID.3 GTX
Toyota Car: नाव मोठे, विक्रीत तोटे! फेब्रुवारीमध्ये फक्त 57 लोकांनी खरेदी केली ही लक्झरी कार

ID.3 GTX सोबत Volkswagen ने ID.7GTX टूरर देखील रिव्हील केली आहे. दोन्ही मॉडेल चांगल्या डिझाइन आणि पॉवरफुल रेंजसह येतात. दरम्यान, भारतात ही कार लॉन्च होणार की नाही, याबाबत कंपनीकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. तसेच याची किंमत किती आहे, याबाबतही अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com