प्रसिद्ध वाहन उत्पादक कंपनी टोयोटाने फेब्रुवारी 2024 मध्ये आपल्या विक्रीचे आकडे प्रसिद्ध केले आहे. या महिन्यात कंपनीची लोकप्रिय कार इनोव्हाची सर्वाधिक विक्री झाली. तर कंपनीच्या सर्वात महागड्या वेलफायरची विक्री केवळ 57 युनिट्स होती. गेल्या काही महिन्यांपासून वेलफायरची विक्री खूपच कमी झाली आहे.
सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये या कारची विक्री 0 आणि 3 वर आली होती. वेलफायरची प्रारंभिक किंमत 1.20 कोटी रुपये आहे. टोयोटाच्या एकूण विक्रीत वेलफायरचा बाजारातील वाटा फक्त 0.24 टक्के आहे. सहा महिन्यात या कारची किती झाली विक्री? हे जाणून घेऊ... ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
सप्टेंबर 2023 - 0
ऑक्टोबर 2023 - 3
नोव्हेंबर 2023 - 53
डिसेंबर 2023 - 37
जानेवारी 2024 - 61
फेब्रुवारी 2024 - 57
Toyota Vellfire Strong Hybrid मॉडेलमध्ये 2.5-लिटर इनलाइन फोर-सिलेंडर DOHC इंजिन मिळते. जे 142 kW चे पॉवर आणि 240 Nm टॉर्क जनरेट करते. इंजिन इलेक्ट्रिक मोटर आणि हायब्रिड बॅटरीसह येते. (Latest Marathi News)
कारच्या आतमध्ये एक खूप लांब ओव्हरहेड कन्सोल आहे. जो छताच्या मध्यभागी बसवला आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी यात अनेक कंट्रोल देण्यात आली आहेत. यात 15 जेबीएल स्पीकर, ॲपल कार प्ले आणि अँड्रॉइड ऑटो कंपॅटिबिलिटीसह 14 इंची इन्फोटेनमेंट सिस्टम सारखे फीचर्स यात देण्यात आले आहेत.
ही कार रिमोट डोर लॉक/अनलॉक, एअर कंडिशनिंग, ड्रायव्हर मॉनिटरिंग अलर्ट यासारख्या 60 हून अधिक कनेक्ट फीचर्ससह येते. टोयोटाचे हे मॉडेल Advanced Driver Assistant System (ADAS) सारख्या सेफ्टी फीचर्ससह येते. यात क्रूझ कंट्रोल, लेन ट्रेस असिस्टन्स, हाय बीम एलईडी हेडलॅम्प आणि ब्लाइंड स्पॉट मॉनिटर सारखेही फीचर्स देण्यात आले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.