Hyundai Creta N Line Launched: भारतात लॉन्च झाली ह्युंदाई क्रेटा एन लाइन, जाणून घ्या फिचर्स अन् किंमत

Hyundai Motors : ह्युंदाई कंपनीने भारतात कार क्रेटा एन लाइन लॉन्च केलीय. आय२० एन लाइन आणि वेन्यू एन लाइन सीरिजमधील ही तिसरी कार लॉन्च केली.
Hyundai Creta N Line Launched: भारतात लॉन्च झाली ह्युंदाई क्रेटा एन लाइन, जाणून घ्या फिचर्स अन् किंमत

Hyundai Creta N Line

Hyundai Motors ने आपली बहुप्रतिक्षित एसयूव्ही कार क्रेटा एन लाइन लॉन्च केलीय. या कारची एक्स शोरूम किंमत तुम्हाला परवडणारी आहे. कंपनीने ह्युंदाई कार दोन प्रकारात बाजारात आणलीय. भारतीय बाजारात असलेल्या आय२० एन लाइन आणि वेन्यू एन लाइन सीरिजमध्ये कंपनीने ही एक तिसरी एन लाइन कार बाजारात उतरवलीय. (Latest News)

Hyundai Creta N Line: प्रकार आणि किंमत

  • एन8 एमटी 16.82 लाख रुपये (एक्स शोरूम)

  • एन8 डीसीटी 18.32 लाख रुपये (एक्स शोरूम)

  • एन10 एमटी 19.34 लाख रुपये (एक्स शोरूम)

  • एन10 डीसीटी 20.29 लाख रुपये एक्स शोरूम)

इतर N Line वाहनांप्रमाणेच Hyundai Creta N Line मध्ये अपडेटेड सस्पेन्शन, फास्ट हॅण्डलिंग आणि थ्रॉटी एक्झॉस्ट असून ते कारच्या स्पोर्टीनेसमध्ये भर घालते. स्पोर्टीनेस म्हणजे काय तर शाईन यात एन लाइनमध्ये नवीन ग्रील, लाल इन्सर्टसह अपडेट बंपर, लाल ब्रेक कॅलिपर आणि दोन्ही टोकांना स्किड प्लेट्स बसवण्यात आले आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नवीन Hyundai Creta N लाइनचे मुख्य आकर्षण म्हणजे कारचं इंजिन. क्रॉस ओवरला शक्ती देणारे Hyundai चे 1.5-लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन 158bhp पॉवर आणि 253Nm पीक टॉर्क जनरेट करते. इंजिन मॅन्युअल ट्रान्समिशन आणि 7-स्पीड डीसीटीच्या पर्यायासह उपलब्ध आहेत. हे तेच इंजिन आहे जे रेग्युलर क्रेटामध्ये देखील दिले जाते. दरम्यान बाजारात ही कार उतरवल्यानंतर या कारची स्पर्धा थेट क्रेटा एन लाइन सेल्टोस एक्स लाइन, नियमित सेल्टोस आणि मानक क्रेटा यांच्याशी आहे.

Hyundai Creta N Line Launched: भारतात लॉन्च झाली ह्युंदाई क्रेटा एन लाइन, जाणून घ्या फिचर्स अन् किंमत
Hero Splendor सह या 5 बाईक देतात जबरदस्त मायलेज, किंमत 1 लाखपेक्षा कमी; पाहा लिस्ट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com