Realme ने काही दिवसांपूर्वी Realme 12 सीरीजचे नवीन फोन बाजारात आणले आहेत. 19 मार्च रोजी कंपनी आणखी एक नवीन स्मार्टफोन Realme Narzo 70 Pro लॉन्च करणार आहे. याचदरम्यान Realme GT Neo 6 बद्दलही चर्चा सुरू झाली आहे. फोनच्या लॉन्च तारखेबद्दल कंपनीने अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
कंपनीचा हा आगामी फोन स्नॅपड्रॅगन 8 सीरीज प्रोसेसरने सुसज्ज असेल. गेल्या महिन्यात मॉडेल नंबर RMX3851 सह Realme फोन बेंचमार्किंग प्लॅटफॉर्म गीकबेंचवर दिसला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
लिस्टिंगवरून असा अंदाज लावला जात आहे की, हा Realme फोन लवकरच लॉन्च होऊ शकतो. नवीन Realme फोनला AnTuTu वर 1,846,775 पॉईंट्स मिळाले आहेत. हा फोन Snapdragon 8s Gen 3 चिपसेट सह येऊ शकतो. क्वालकॉमचा हा प्रोसेसर स्नॅपड्रॅगन 8 जनरल 3 चा अंडरक्लॉक व्हर्जन यात असू शकतो. कंपनी फोनमध्ये ग्राफिक्ससाठी Adreno 735 देऊ शकते. (Latest Marathi News)
लीक झालेल्या रिपोर्ट्सनुसार, हा Realme फोन 1.5K रिझोल्यूशनसह OLED डिस्प्लेसह येऊ शकतो. हा डिस्प्ले 144Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. कंपनी हा फोन 24 जीबी रॅम आणि 1 टीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज पर्यायामध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 50-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा मिळू शकतो.
हा कॅमेरा OIS म्हणजेच ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन फीचरला सपोर्ट करेल. फोनच्या बॅटरीबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र अशी शक्यता वर्तवली जात आहे की, फोन 100-वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. हा फोन BIS वर देखील लिस्ट करण्यात आला आहे.
Realme 19 मार्च रोजी भारतात Narzo 70 Pro 5G लॉन्च करणार आहे. कंपनीने लॉन्चपूर्वीच सांगितलं आहे केली आहे की, हा फोन 67 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. या व्यतिरिक्त कंपनीने असेही म्हटले आहे की, ते फोनमध्ये AMOLED डिस्प्ले देणार आहे. ज्याची पीक ब्राइटनेस 2000 nits असेल. Sony IMX890 कॅमेरा ऑफर करणारा हा फोन त्याच्या सेगमेंटमधील पहिला फोन असेल. कंपनीने शेअर केलेल्या टीझरनुसार, फोन नवीन डुओ टच ग्लास डिझाइनसह येईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.