EPFO 3.0 Saam tv
बिझनेस

EPFO 3.0: आता एटीएममधून काढता येणार PFचे पैसे; EPFO 3.0 कसं काम करणार? वाचा सविस्तर

EPFO 3.0 Rules: केंद्र सरकार लवकरच EPFO 3.0 लाँच करणार आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना एटीएममधून पीएफचे पैसे काढता येणार आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना खूप फायदा होणार आहे.

Siddhi Hande

EPFO 3.0 लवकरच होणार लाँच

पीएफ एटीएममधून काढता येणार

नवीन अपडेटमुळे ईपीएफओ कर्मचाऱ्यांना होणार फायदा

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना लवकरच ईपीएफओ ३.० लाँच करणार आहे. ईपीएफओ ३.० मुळे पीएफ काढण्याच्या प्रक्रियेत महत्त्वाचा बदल होणार आहे. या नवीन अपडेटमुळे पीएफमधून पैसे काढणे सोपे होणार आहे. तुम्ही अवघ्या काही मिनिटांत पीएफमधील पैसे काढू शकतात.

ईपीएफओद्वारे पीएफ बॅलेन्सचे पैसे काढण्यासाठी खूप वाट पाहावी लागते. दरम्यान, आता यासाठी एटीएम कार्ड दिले जाणार आहे. तुम्ही एटीएममधून पीएफचे पैसे काढू शकतात. यासाठी तुम्हाला कार्डदेखील दिले जाणार आहे.

ईपीएफओ 3.0 कसं काम करणार? (EPFO 3.0 Working Update)

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, ईपीएफओ 3.0चे मुख्य उद्दिष्ट कर्मचाऱ्यांचे त्यांच्या पैशांवर नियंत्रण ठेवणे आहे. त्यांना पैसे काढण्याची मुभा देणे, पीएफचे पैसे काढण्याची प्रक्रिया अजून सोपी करणे, हे आहे.

डेबिट कार्डचा वापर करता येणार

पीएफचे पैसे तुम्ही एटीएम कार्डद्वारे काढू शकणार आहे. जसे तुम्ही बँक डेबिट कार्डचा वापर करता तसंच पीएफ एटीएम कार्डचा वापर करता येणार आहे.

७५ टक्क्यांपर्यंत पैसे काढता येणार

तुम्ही आप्तकालीन परिस्थितीत, मेडिकलसाठी किंवा घराचे बांधकाम करण्यासाठी आणि बेरोजगार असाल तर तुम्हाला पीएफमधून पैसे काढता येणार आहे. तुम्ही ७५ टक्क्यांपर्यंत पैसे काढू शकतात.

किती पैसे काढू शकणार? (How Much PF You Can Withdraw)

पीएफ खात्यातून किती पैसे काढू शकणार,याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, तुम्ही १ ते २ लाख रुपयांपर्यंत पैसे काढण्याची लिमिट दिली जाऊ शकते, असा अंदाज आहे. याबाबत लवकरच घोषणा केली जाईल.

पीएफ ट्रान्सफर (PF Transfer)

ईपीएफओ कर्मचारी आता ऑनलाइन पद्धतीने पीएफ ट्रान्सफर करु शकतात. तुम्ही कंपनी बदलताना पीएफचे पैसे ट्रान्सफर करण्याची सुविधा सोपी होणार आहे.

क्लेमची प्रोसेस (PF Claim Process)

ईपीएफओ कर्मचाऱ्यांना आता क्लेम करणे खूप सोपे होणार आहे. तुम्ही थेट ईपीएफओ पोर्टलवरुन पीएफ क्लेम करु शकणार आहात.

फायदा काय होणार?

EPFO 3.0 मुळे तुमच्या वेळेची बचत होणार आहे. तुम्हाला ईपीएफओ ऑफिसमध्ये जाण्याची गरज भासणार नाही. संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन असल्याने सर्वकाही पारदर्शक पद्धतीने होणार आहे. तुम्ही कुठेही कधीही पीएफ अकाउंट वापरु शकतात. ही प्रोसेस खूप सोपी झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजपला सर्वात मोठा धक्का; मुख्यमंत्र्यांचं डॅमेज कंट्रोल निष्फळ, माजी मंत्र्याने साथ सोडत काँग्रेसचा 'हात' पकडला

Tulsi Water Benefits For Weight Loss: झटपट वजन कमी करण्यासाठी प्या तुळशीचं पाणी, आठवडाभरातच जाणवेल मोठा फरक

Hidden Fort In Pune : पुण्यात लपलाय वन डे ट्रेकिंग स्पॉट, 'या' किल्ल्यावरून दिसते सह्याद्रीचे सुंदर दृश्य

Maharashtra Politics: कुणीही असू द्या, ओढून मारू; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याची ठाकरेंच्या आमदाराला थेट धमकी

Bigg Boss Marathi 6 : बिग बॉसच्या घरातून आणखी एका स्पर्धकाची एक्झिट, अवघ्या महिन्याभरात संस्कृतीनं गाशा गुंडाळला

SCROLL FOR NEXT