Maharashtra News Live Update: मराठा अभ्यासक आणि सरकारच्या शिष्टमंडळमध्ये चर्चा सुरू

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : राज्यात मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ अन् विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा, राजकीय घडामोडी, देशातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra News Live Update:
Maharashtra News Live Update:Saam TV Marathi news
Published On

मराठा अभ्यासक आणि सरकारच्या शिष्टमंडळमध्ये चर्चा सुरू

मनोज जरांगे याची भेट घेण्यापूर्वी शिष्टमंडळ अभ्यासकांनी चर्चा करत आहे.

अभ्यासकांशी चर्चा केल्यानंतर शिष्ट मंडळ जरांगे यांची भेट घेणार आहे.

अमरावती जिल्ह्यातील दर्यापुरातील फर्निचर कारखान्याला भीषण आग; लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक

अमरावतीच्या दर्यापूर शहरातील अकोट मार्गावर असलेल्या आदर्श हायस्कूलसमोरील 'गरीब नवाज फर्निचर वर्क' या कारखान्याला अचानक भीषण आग लागली. या आगीने पाहता पाहता रौद्ररूप धारण केले,ज्यामध्ये कारखान्यातील फर्निचर साहित्य आणि इतर वस्तू जळून खाक झाल्या. लयात लाखो रुपयांच नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आग लागताच परिसरात प्रचंड खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली.

कराड शहर पोलिसांची मोठी कारवाई, 95.78 ग्रॅम एमडी ड्रग जप्त

कराड शहरात एमडी मेफोड्रोन घेऊन विक्रीसाठी आलेल्या तिघांना कराड शहर पोलिसांनी पुणे बंगलोर

महामार्गावर वारुंजी फाटा येथे सापळा रचून अटक केली.

यामध्ये 95.78 ग्रॅम एमडी मेफोड्रोन जप्त करण्यात आले आहे. इनोव्हा गाडीसह 18 लाख 82 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करत तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

कोल्हापूरमध्ये वीज वितरणाच्या डीपीने अचानक घेतला पेट

कोल्हापुरातील ताराराणी चौक परिसरातील वीज वितरणाच्या डीपीने (ट्रान्सफॉर्मर) अचानक पेट घेतल्याने काही काळ नागरिकांमध्ये घबराट पसरली. डीपीमधून ठिणग्या उडाल्यानंतर आग लागली. घटनेची माहिती मिळताच महावितरणचे कर्मचारी आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. सुरक्षेच्या कारणास्तव परिसरातील वीजपुरवठा तात्पुरता बंद करण्यात आला असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करण्यात आले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगेंच्या भेटीला रवाना

मनोज जरांगे यांनी आजपासून भर उन्हात आमरण उपोषणाला सुरुवात केली असून त्यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी सरकारचे शिष्टमंडळ संभाजीनगरहून रवाना झाले आहे.

पुणे: निकृष्ट काम केल्याने ठेकेदाराला १० लाख रुपयांचा दंड

पुणे महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांचे आदेश

पुण्यातील धायरी भागातील रस्ते दुरूस्तीचे काम निकृष्ट दर्जाचे काम केल्याप्रकरणी ठेकेदाराला तब्बल १० लाख रुपयांचा दंड

रस्ता सिमेंट काँक्रिट टाकून खोदलेला रस्ता पूर्ववत करण्यात आला पण त्यावरून वाहने जाऊ नयेत, सिमेंट सुकावे यासाठी ठेकेदाराने कोणतीही उपाययोजना केल्या नव्हत्या

अवघ्या काही तासात सिमेंट निघण्यास सुरुवात झाली

नागपुरात पावसाच्या हलक्या सरी; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा

नागपूर शहरातील काही भागांत शनिवारी अचानक पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. सुसाट वारे आणि ढगाळ वातावरणामुळे शहरात गारवा निर्माण झाला. दिवसभराच्या कडक उन्हामुळे वाढलेल्या उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. दरम्यान, हवामान विभागाने नागपूर, वर्धा, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांत अवकाळी पाऊस तसेच वादळी वाऱ्याचा इशारा दिला आहे. बदललेल्या हवामानामुळे तापमानातही किंचित घट नोंदवली गेली.

भंडाऱ्यात विजांच्या कडकडाटासह मान्सूनपूर्व पावसाची हजेरी

भंडाऱ्यात सायंकाळी वादळीवारा आणि विजांच्या कडकडाटासह मान्सूनपूर्व पावसानं जोरदार हजेरी लावली. मागील काही दिवसांपासून भंडाऱ्याचा तापमान ४५ अंश डिग्री सेल्सिअस वर पोहोचल्याने प्रचंड उकाडा निर्माण झाला होता. या उकड्यामुळे नागरिकांसह पाळीव जनावर आणि पशुपक्षीही हैराण झाले होते. आज सायंकाळी आलेल्या या मान्सूनपूर्व पावसानं वातावरणात गारवा निर्माण झाल्याने नागरिकांना उकड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे.

नांदेडमध्ये अतिक्रमण हटविण्याची कारवाई फसली; महापालिकेच्या पथकाची माघार

नांदेड शहरातील हिंगोली गेट उड्डाणपुलाखालील कथित अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या महानगरपालिकेच्या पथकाला कोणतीही कारवाई न करताच परतावे लागले. संबंधित जागेवर दोन व्यक्तींमध्ये मालकी हक्काचा वाद असून प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्याची माहिती समोर आली. पोलीस बंदोबस्तासह घटनास्थळी पोहोचलेल्या अधिकाऱ्यांना नागरिकांच्या विरोधालाही सामोरे जावे लागले.

Raigad: मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, दोन ठार, दोन जखमी

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, दोन ठार, दोन जखमी

रत्नागिरीच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर उभ्या असलेल्या कंटेनरला कारची मागून धडक

पोलादपूर तालुक्यात लोहारमाळ गावाच्या हद्दीतील घटना

Raigad: रायगडच्या इंदापूर येथे एसटी चालकाला भररस्त्यात मारहाण, व्हिडिओ होतोय व्हायरल

रायगड -

- रायगडच्या इंदापुर येथे एसटी चालकाला भररस्त्यात मारहाण

- मारहाणीचा व्हिडिओ होतोय व्हायरल

- इंदापूर एसटी स्टॅन्डसमोर मुबंई- गोवा महामार्गावरील घटना

- कारमधील प्रवाशांनी एसटी बससमोर कार आडवी टाकत चालकाला केली मारहाण

Kolhapur: गोकुळ निवडणुकीसाठी महायुती देखील उतरली मैदानात

कोल्हापूर -

गोकुळ निवडणुकीसाठी महायुती देखील उतरली मैदानात

छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडी च्या माध्यमातून निवडणूक लढवली जाणार

गोकुळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या नेत्यांची आज पार पडली महत्त्वपूर्ण बैठक

बैठकीला मंत्री चंद्रकांत दादा पाटील, हसन मुश्रीफ,प्रकाश अबिटकर, विनय कोरे, खासदार धनंजय महाडिक यांच्यासह महायुतीच्या नेत्यांची उपस्थिती

गोकुळ निवडणुकीच्या निमित्ताने कोल्हापूरमध्ये पुन्हा एकदा महायुती विरुद्ध सतेज पाटील असा सामना रंगणार

Raigad: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे किल्ले रायगडावर अनोखे आंदोलन

रायगड -

- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे किल्ले रायगडावर अनोखे आंदोलन

- रायगड प्राधिकरण आणि पुरातत्व खात्याला दिला शौच्यालयाच भांडं भेट

- मनसेचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष राजु पार्टे यांच्या नेतृत्वाखाली माणगाव तालुकाध्यक्ष चिमण सुखदरे, महाड शहराध्यक्ष पंकज उमासरे, गोपाळ मोरे, अक्षय केकाणे यांनी केल आंदोलन

- २ दिवसांपूर्वी एका पर्यटक महिलेने रायगड किल्ल्यावरील शौच्यालयाचा प्रश्न सोशल मिडीयावरून महाराष्ट्रासमोर मांडला होता

- महिलेच्या त्या व्हायरल व्हिडीओची दखल घेत मनसेने पुरातत्व विभाग आणि रायगड प्राधिकरणाला दिल शौच्यालयाचं भांड भेट

- योग्य दखल घेत सुविधा दिली नाही तर मनसे स्टाईलमध्ये उग्र आंदोलन करणार

Latur: मनोज जरांगे यांच्या आंदोलना पाठिंबा देण्यासाठी लातूर- अंबाजोगाई महामार्ग अडवला

लातूर -

मनोज जरांगे यांच्या आंदोलना पाठिंबा देण्यासाठी लातूर- अंबाजोगाई महामार्ग अडवला

महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

एक तासापासून महामार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरू

ahilyanagar : प्राजक्त तनपुरे यांच्या भाजप प्रवेशानंतर राहुरीत कार्यकर्त्यांचा जल्लोष

प्राजक्त तनपुरे यांच्या भाजप प्रवेशानंतर राहुरीत मोठा जल्लोष बघायला मिळतोय. तनपुरे यांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी करत भाजपचा जयघोष केलाय.

Panvel : आयपीएलचा सट्टा लावणाऱ्यांना पोलिसांकडून अटक 

आयपीएलचा सट्टा लावणाऱ्या आरोपींना पनवेलमध्ये पोलिसांनी केली अटक

पनवेल येथील एका फार्महाउस वर १३ तरुणांच्या टोळीला घेतले ताब्यात

पनवेलमध्ये गुन्हे शाखेने कारवाई केली आहे

आयपीएल वर सट्टा लावणाऱ्या १३ आरोपींना केली अटक

या सर्व आरोपींना कोर्टात हजर केले जाणार आहे

नवी मुंबई पोलिसांकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे

hingoli : एक हजार दोनशे एकरमधील सव्वा लाख झाडांची कत्तल

हिंगोलीत बाराशे एकरवरील सव्वा लाख झाडांची बेकायदेशीररित्या कत्तल करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. टाटा सोलर एनर्जी प्रकल्प व्यवस्थापनाने वनविभागाची कोणतीही परवानगी न घेता शेतकऱ्यांच्या भाडेतत्त्वावर घेतलेल्या जमिनीमधील ही वृक्ष तोडण्यात आली आहेत. धक्कादायक बाब म्हणजे सागवान झाडांसारखी मौल्यवान वृक्ष देखील या कंपनीकडून तोडून परस्पर त्याची विक्री करण्यात आल्याचा देखील चौकशीमध्ये पुढे आलं आहे. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असताना आणि अवैध वृक्षतोड सुरू असताना कोणी विभागाचे शेकडो कर्मचारी आणि अधिकारी नेमकं काय करत होते, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.

Santosh Deshmukh : संतोष देशमुख हत्या प्रकरण, साक्षीदाराच्या भावाला धमकी 

संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. हत्या प्रकरणातील साक्षीदाराला सख्ख्या भावाने धमकी दिली आहे. या धमकीमुळे खळबळ उडाली आहे.

Neet : नीट पेपरफुटी प्रकरणात अपडेट समोर, हवालदारचे हस्ताक्षर-सहीचे नमुने तपासले जाणार

नीट पेपरफुटी प्रकरणात अपडेट समोर

मनिषा हवालदारचे हस्ताक्षर आणि सह्यांचे नमुने तपासले जाणार

"सिग्नेचर स्पेसिमन" तपासण्यासाठी सीबीआयने केली होती न्यायालयाला विनंती

हवालदारने स्वतःकडे ठेवलेल्या नोट्स तपासले जाणार

न्यायालयाने सीबीआयची मागणी केली मान्य

हवालदार यांचे हस्ताक्षर आणि साह्यांचे नमुने घेऊन फॉरेन्सिक विभागाला पाठवले जाणार

manoj Jarange : मनोज जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण सुरू

मनोज जरांगे पाटील यांचे 4 तासांपासून उन्हात आमरण उपोषण सुरू...

मोठ्या संख्येने मराठा आंदोलक अंतरवाली सराटीत दाखल...

मराठा बांधव देखील मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी उन्हात बसून आहेत...

सरकारने ड्राफ्ट दिल्यानंतर सायंकाळी 5 वाजता अभ्यासकांची बैठक होणार असून रात्री 8 वाजता मनोज जरांगे पाटील सरकारला त्यांची भूमिका सांगणार आहे.

Raigad : रायगड जिल्ह्यात अनेक भागात वाहतूक कोंडी

० शनिवार रविवार सुट्टीकरिता मोठ्या प्रमाणात पर्यटक कोकणात दाखल

० मुंबई गोवा महामार्ग, अलिबाग वडखळ, माणगाव पुणे मार्गावर मोठी वाहतूक कोंडी

० अलिबाग वडखळ मार्गावर चार किमीच्या वाहनांच्या रांगा तर मुंबई गोवा महामार्गावर माणगाव जवळ 3 किमीच्या वाहनांच्या रांगा

० अलिबाग वडखळ मार्गावर वडखळ ते पेझारी पर्यंत वाहतूक कोंडी

० दोन दिवस सलग सुट्टी असल्याने पर्यटक अलिबाग, नागाव, श्रीवर्धन, हरिहरेश्वर परिसरात पर्यटक रवाना

Sangli News : सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीत महायुतीमध्ये बिघाडीची शक्यता?

सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीत महायुतीमध्ये बिघाडीची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सांगलीतून शिवसेना शिंदे पक्षाने महायुतीत फडकवला बंडाचा झेंडा !

शिवसेना शिंदे पक्षाचे नेते व सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे संचालक तानाजी पाटलांनी भरला उमेदवारी अर्ज

शक्ती प्रदर्शन करत तानाजी पाटील यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

आटपाडी तालुक्यातील शिवसेना शिंदे पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा दाखल केला उमेदवारी अर्ज

आमदार महेंद्र दळवी यांच्या मुलीने उमेदवारी अपक्ष अर्ज केला दाखल 

रायगड मधील अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्या मुलीने आज विधान परिषद निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज अपक्ष म्हणून दाखल केला.आम्ही तटकरेंच्या विरोधात आहोत. त्यांनी कायम अन्याय केला आहे. एकनाथ शिंदे साहेब काय बोलतात? तटकरेंना आमचा विरोध आहे जर अनिकेत तटकरेंना उमेदवारी मिळाली तर त्यांचा आम्ही प्रचार करणार नाही आम्ही तटस्थ भूमिका घेऊ.

वाकड परिसरातील अवैध हात भट्टी दारू अड्डा पोलिसांनी केला उध्वस्त

पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरात विषारी दारू ने एकूण 22 बळी घेतल्यानंतर पोलीस प्रशासनाला आता उशिरा जाग आली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरात आज वाकड पोलिसांनी धाड टाकून एक अवैध हातभट्टी दारू धंदा उध्वस्त केला आहे. वाकड पोलीस स्टेशन पासून अगदी काही किलोमीटरच्या अंतरावर एक अवैध हातभट्टी दारू अड्डा चालत होता. त्या ठिकाणी प्लास्टिकच्या फुग्यांमध्ये अवैध हातभट्टी दारू ग्राहकांना विक्री विक्री करण्यात येत होती. मात्र पोलिसांनी आता हा अवैध दारू धंदा धाड टाकून उध्वस्त केला आहे.

शिर्डीहून मुंबईकडे निघालेले प्रसाद लाड पुन्हा अंतरवली सराटीकडे रवाना

शिर्डीहून मुंबईकडे निघालेले प्रसाद लाड पुन्हा अंतरवली सराटीकडे रवाना...

मुख्यमंत्र्यांचा फोन आल्याने मुंबईकडे निघालेले लाड पुन्हा माघारी फिरले...

अंतरवली सराटीत जाऊन घेणार जरांगे यांची भेट...

काही वेळापूर्वीच उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे यांनी घेतली जरांगे यांची भेट..

विखे पाटलांपाठोपाठ प्रसाद लाड पुन्हा जरांगे यांच्या भेटीसाठी रवाना...

मायेपुढे बिबट्याही नमला; सासूसाठी सुनबाई आणि नातू बिबट्याला भिडले!

शिरूर तालुक्यातील इनामगाव येथे अंगणात झोपलेल्या वृद्ध महिलेवर बिबट्याने हल्ल्याचा प्रयत्न केला. मात्र सासूबाईंच्या बचावासाठी सुनबाई आणि नातू जीवाची पर्वा न करता धावल्याने मोठा अनर्थ टळला.

Jalna: मनोज जरांगे पाटील यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना तपासणीसाठी नकार दिला 

मनोज जरांगे पाटील यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना तपासणीसाठी नकार दिला.

मनोज जरांगे पाटील हे रखरखत्या उन्हामध्ये उपोषणाला बसले आहेत.

वैद्यकीय पथक तपासणीसाठी आले असता म्हणून जरांगे पाटील यांनी तपासणीसाठी नकार दिला.

40 वर्षापासून सुरू असलेल्या अवैध दारू धंद्यांवर पोलिसांनी का कारवाई केली नाही - अण्णा बनसोडे 

पिंपरी चिंचवड शहरातील फुगेवाडी परिसरामध्ये अवैध दारू विक्रीमुळे आतापर्यंत 11 जणांचा बळी गेला आहे . तर चार जणांचे प्रकृती अतिशय चिंताजनक आहे. मात्र फुगेवाडी परिसरात मागील 40 वर्षापासून अवैध दारू विक्री व्यवसाय सुरू होता. वारंवार याची माहिती स्थानिक नागरिक पोलीस विभागाला देत होते तरीसुद्धा कारवाई का झाली नाही असा संतप्त सवाल विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी उपस्थित केला आहे.

सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक यांचा कारभारामुळे जिल्ह्याचे नुकसान

सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक यांचा कारभारामुळे जिल्ह्याचे नुकसान

अनैतिक धंद्याना मोहन दहिकर यांचा पाठींबा

दहीकर यांच्या कार्यकाळात सिंधुदुर्ग जिल्ह्यात आता पर्यंत बाराशे गुन्हे रजिस्टर

या गुन्ह्य़ा संदर्भात माहीती घेण्याचा प्रयत्न केला तर संबंधित अधीकारी रजेवर गेले

गुन्ह्य़ाचा तपास नाही शोध नाही

माझा आक्षेप पोलीस डिपार्टमेंट वर नाही तर त्याच्या बाॅस वर आहे

अवैध दारू ही जिल्ह्याला लागलेली कीड आहे. हे रॅकेट कार्यरत आहे.

माहेरी आलेल्या महिलेची गळा चिरून हत्या

एका विवाहित महिलेची धारदार शस्त्राने गळा चिरून निघृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्यातील राजूर तालुक्यातील वेकोलिच्या धोपटाळा कामगार वसाहतीत घटना घडली.

पेट्रोल, डिझेल दरवाढी विरोधात काँग्रेसची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

पेट्रोल, डिझेल दरवाढी विरोधात काँग्रेसची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

आठ दिवसात दरवाढ मागे घेऊन पुरवठा सुरळीत करा ; अन्यथा जिल्हाभर आंदोलन छेडण्याचा इशारा

कोल्हापुरात मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी आंदोलन

मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आज पासून मराठा आरक्षण लागू व्हावे या मागणीसाठी पुन्हा आंदोलनास सुरुवात केलेली आहे.

या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील सखल मराठा समाजाच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी तसेच मराठा आरक्षण लागू करत असताना कोल्हापूर गॅझेटचा समावेश व्हावा या प्रमुख मागणीसाठी कोल्हापुरातील दसरा चौक परिसरात आंदोलन करण्यात येत आहे.

या आंदोलनात खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्यासह सकल मराठा समाज समन्वयक दिलीप देसाई, एडवोकेट बाबा इंदुलकर, विजय देवणे, बाबा पार्टे यांच्यासह अन्य सकल मराठा समाजातील नागरिक उपस्थित आहेत...

निवडणुकीसाठी शेत जमीन विकणाऱ्या कार्यकर्त्याच्या मदतीला खासदार श्रीकांत शिंदे आले धावून

निवडणुकीसाठी शेत जमीन विकणाऱ्या कार्यकर्त्याच्या मदतीला खासदार श्रीकांत शिंदे आले धावून.

विकलेली जमीन मिळवून दिली परत

मदत मिळताच कार्यकर्त्याचा अश्रूचा बांध फुटला

Maratha Protest : शाहू महाराजांचा मनोज जरांगे यांच्या मराठा आंदोलनाला पाठिंबा

पंढरपूर कुर्डुवाडीत कुस्त्यांची दंगल

सोलापूरच्या कुर्डुवाडीत कुस्त्यांची दंगल पाहायला मिळाली. कुस्ती स्पर्धेसाठी राज्यभरातील नामवंत मल्लांनी हजेरी लावली होती. चित्रपट अभिनेत्री दीपाली सय्यद यांच्या हस्ते कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. पैलवान अस्लम काझी यांनी कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले होतो. लाखो रूपयांची बक्षीसे देण्यात आली. स्पर्धा पाहाण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातून कुस्ती प्रेमींनी गर्दी केली होती.‌

Manoj Jarange : मराठा बांधवांनी समृद्धी महामार्ग रोखला

मनोज जरांगे उपोषणाला बसल्यानंतर मराठा समाज आक्रमक...

जालन्यात समृद्धी महामार्गावर मराठा समाजाचा रस्ता रोको...

समृद्धी महामार्गावर नाव्हा शिवारात मराठा बांधवांनी समृद्धी महामार्ग रोखला.

पुण्यात शिवसेनेकडून दारूचे अड्डे उध्वस्त

पुण्यात शिवसेनेकडून दारूचे अड्डे उध्वस्त

पुण्यात दारूचे केले उध्वस्त

महमदवाडी कृष्णानगर परिसरातील दारूचे अड्डे केले उद्ध्वस्त

शिवसेना शिंदे गटाच्या शहराध्यक्ष आणि कार्यकर्त्यांनी दारूचे अड्डे केले उध्वस्त

हडपसर परिसरातील सात जण विषारी दारूमुळे मृत्यू झालाय

यावर आता शिवसेना आक्रमक झाली

आज सकाळी शिवसेनेने दोन ते तीन ठिकाणी दारूच्या उध्वस्त केले आहेत

पुण्यात अजून एक विषारी दारूचा बळी

पुण्यात अजून एक विषारी दारूचा बळी

पुण्यातील मृत्यू संख्या ७ वर

पुण्याच्या हडपसरमधील पांढरे मळ्यात विषारी दारूमुळे आणखी एकाचा मृत्यू.

सम्युवेल लिंकन धैयर्म असे विषारी दारूमुळे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव..

पांढरे मळ्यातील विषारी दारूमुळे ७ वा बळी

Manoj Jarange : मनोज जरांगे यांचं आजपासून पुन्हा उपोषण

डामरखेडा गोमाई पुलाच्या कामाला जुलैअखेरची डेडलाइन

नंदुरबार जिल्ह्यातीलअंकलेश्वर-बऱ्हाणपूर महामार्गावरील डामरखेडा येथील गोमाई नदीवरील नवीन पुलाचे काम जुलैअखेर पूर्ण करून ऑगस्टमध्ये वाहतुकीसाठी खुले करण्याचे लक्ष्य जिल्हा प्रशासनाने ठेवले आहे.

जुना पूल कमकुवत झाल्याने अडीच वर्षांपासून अवजड वाहतूक बंद असून, वाहनचालकांना 20-25 किलोमीटरचा अतिरिक्त फेरा मारावा लागत आहे. स

ध्या नवीन पुलाचे पिलरचे काम पूर्ण झाले असून गर्डर बसवण्याचे काम शिल्लक आहे. कामाला गती देण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी दर आठवड्याला आढावा घेत आहेत.

सोलापुरात हिप्परगा तलावावर पोहण्यासाठी केलेल्या तरुणाचा बुडून दुर्दैवी मृत्यू.

मोसिन रशीद शेख असं बुडून मृत्यू झालेल्या युवकाचे नाव, सोलापुरातील नई जिंदगी परिसरातील विष्णू नगर येथील रहिवासी

मोसिन शेख हा आपल्या मित्रांसह हिप्परगा तलावात पोहण्यासाठी गेला होता

गोवळकोट किल्ला पुन्हा वादात भोवऱ्यात

दोन आंबे उचलले म्हणून गुहागर मधील गोपाळगड किल्यावर पर्यटकांना डांबून ठेवण्याचा झालेल्या प्रयत्ना नंतर स्थानिक आणि दुर्गप्रेमी संघटना आक्रमक झाल्या आहेत. गोपाळगड किल्ल्यावर स्वतःचा मालकी हक्क सांगत असतानाचा व्हिडीओ वायरल झाल्यावर रत्नागिरी जिल्ह्यात संतापाची लाट उसळल्याचे पाहायला मिळत आहे. शासकीय चुकीने गोपाळगड किल्ला मालकी हक्कात गेला होता, मात्र न्यायलयीन लढा दिल्यावर किल्ल्याला राज्य संरक्षित स्मारक जाहीर झाला. मात्र असे असताना पर्यटनासाठी आलेल्या पर्यंटकांसोबत चुकीच्या पद्धतीची वागणूक घडल्या नंतर गोपाळगड किल्ल्याचे प्रकरण पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.

Maharashtra News Live Update: पुण्यात विषारी दारूने घेतले १८ जणांचे बळी; बाहेरून 'गावठी' आणून 'मिथेनॉल' मिसळले

पिंपरी-चिंचवडमधील विषारी दारू प्रकरणाची व्याप्ती पुणे शहरापर्यंत वाढली. शुक्रवारी फुगेवाडीतील आणखी चार जणांचा, तर हडपसरमधील सहा जणांचा या दारूमुळे मृत्यू झाला. मृतांची एकूण संख्या १८ झाली असून, अजून पाच जण अत्यवस्थ आहेत.

Maharashtra News Live Update: यवतमाळ जिल्ह्यात 24 तासात सहा जणांचा उष्माघाताने मृत्यू?

यवतमाळ जिल्ह्यात 24 तासात पाच वर्षीय बालकासह पाच जणांचा उष्मघाताने मृत्यू झाल्याचा संशय

संविधान वासनिक याला रूग्णालयात आणले,त्यावेळी तो मृत होता.त्याचा मृत्यू उष्माघाताने झाल्याची शक्यता आहे.

फुलसावंगी येथील परिसरात 40 वर्षीय इसमाचा संशयास्पद मृत्यू तर आर्णी 1 जवळा 1 आणि घाटंजी तालुक्यातील साखरा येथे एका इसमाचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचा संशय असून मृतकांचे वैद्यकीय अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

नवी मुंबईचे नवे रूप! आता 'स्पोर्ट्स सिटी' म्हणून ओळखली जाणार

आंतरराष्ट्रीय विमानतळ, अत्याधुनिक पायाभूत सुविधा आणि सुनियोजित शहर रचना यांमुळे देशभरात नावाजलेल्या नवी मुंबईच्या शिरपेचात आता आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे. नवी मुंबईला आता 'स्पोर्ट्स शहर' म्हणून विकसित करण्यासाठी पावले उचलली जात आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com