Shruti Vilas Kadam
चेहऱ्याचा एक भाग खाली झुकणे किंवा हसताना चेहरा असमान दिसणे हे स्ट्रोकचे महत्त्वाचे लक्षण असू शकते.
शरीराच्या एका बाजूचा हात किंवा पाय बधीर होणे किंवा उचलताना त्रास होणे.
शब्द स्पष्ट उच्चारता न येणे, तोतरे बोलणे किंवा इतरांचे बोलणे समजण्यात अडथळा येणे.
एका किंवा दोन्ही डोळ्यांनी नीट दिसेनासे होणे किंवा दृष्टी धूसर होणे.
कोणतेही स्पष्ट कारण नसताना अचानक खूप तीव्र डोकेदुखी सुरू होणे.
चालताना असंतुलन जाणवणे, चक्कर येणे किंवा समन्वय बिघडणे.
अचानक संभ्रम निर्माण होणे, साध्या गोष्टी समजण्यात किंवा लक्ष केंद्रित करण्यात अडचण येणे.