PM Kisan Yojana: पीएम किसानचे ₹२००० आले नाहीत? अशा पद्धतीने करा तक्रार; लगेच खात्यात जमा होतील पैसे

PM Kisan Yojana 22nd Installmet Update: पीएम किसान योजनेचा २२वा हप्ता १३ मार्च रोजी जमा करण्यात आला आहे. दरम्यान, अजूनही अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. तुमच्याही खात्यात पैसे जमा झाले नसतील तर अशा पद्धतीने तक्रार करा.
PM Kisan Yojana
PM Kisan YojanaSaam tv
Published On
Summary

पीएम किसान योजनेचा हप्ता जमा

काही शेतकऱ्यांना ₹२००० मिळालेच नाहीत

अशा पद्धतीने करा तक्रार

केंद्र सरकारने जवळपास ९ कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान योजनेचा हप्ता जमा केला आहे. पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रत्येकी २००० रुपये दिले जातात. पीएम किसान योजनेत देशातील गरीब शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जाते. जेणेकरुन त्यांना शेतीच्या उपयोगी उपकरणे घेण्यास मदत होते.

PM Kisan Yojana
PM Kisan Yojana: शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या ₹२००० खटाखट जमा होणार; तुम्हाला मिळणार की नाही? वाचा सविस्तर

पीएम किसान योजनेचा हप्ता जमा (PM Kisan Yojana Installment Recieved)

पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी ६००० रुपये दिले जातात. एकूण ३ हप्ते दिले जातात. प्रत्येत हप्त्यात २००० रुपये जमा केले जातात. दरम्यान, आता शेतकऱ्यांना २२वा हप्ता दिला आहे. १३ मार्च रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले आहे. दरम्यान, अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केलेले नाहीत.

पीएम किसान योजनेत काही शेतकऱ्यांचे पैसे अडकले आहेत. या योजनेत केवायसी केली, फार्मर आयडीदेखील असून अनेक शेतकऱ्यांना लाभ मिळालेला नाही. परंतु तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. तुम्ही अशा पद्धतीने तक्रार करु शकतात.

अशा पद्धतीने करा तक्रार

जर तुम्हाला पीएम किसान योजनेत कोणतीही अडचण आली असेल, तुमच्या खात्यात पैसे जमा झाले नसतील तर तक्रार करु शकतात. यासाठी सरकारने हेल्पलाइन नंबर जारी केला आहे. तुम्ही 155261 किंवा 011-24300606 या नंबरवर कॉल करुन तुम्ही तक्रार नोंदवू शकतात. याचशिवाय तुम्ही pmkisan-ict@gov.in या ईमेल आयडीवर तुमची तक्रार पाठवू शकतात. यासाठी तुमचे नाव, रजिस्ट्रेशन नंबर आणि तक्रारीबाबतची माहिती लिहायची आहे. यानंतर तुमचे पैसे दिले जातील.

PM Kisan Yojana
PM Kisan Yojana: ९.३२ कोटी शेतकऱ्यांसाठी खुशखबर! आज खात्यात जमा होणार ₹२००० ; त्याआधीच कृषीमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती

पैसे जमा न होण्याची कारणे (Why PM Kisan Yojana Installment Not Recieved)

अनेकदा लहान चुकांमुळे तुमच्या खात्यात पैसे जमा केले जात नाही. अनेकदा तुमच्या बँक डिटेल्समध्ये काही चुका असतात. तुमचे खाते क्रमांक किंवा आयएफसी कोड चुकीचा असतो. याचसोबत ईकेवायसी पूर्ण झाली नसेल किंवा चुकीची माहिती भरली असेल तर तुमचे पैसे अटकू शकतात.

PM Kisan Yojana
PM Kisan Yojana : महाराष्ट्रातील ९१ लाख शेतकर्‍यांना गुड न्यूज, तब्बल ₹१,८३७ कोटी जमा; तुमच्या खात्यात पैसे आले का?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com