PF Withdraw Saam Tv
बिझनेस

PF Withdrawal: आता काही मिनिटांत काढता येणार PF खात्यातून १ लाख रुपये; सोपी आहे प्रोसेस; वाचा सविस्तर

PF Withdrawal Of 1 Lakh Through UPI: आता ईपीएफओ लवकरच EPFO 3.0 लाँच करणार आहे. यामुळे आता कर्मचाऱ्यांना १ लाखांपर्यंतचा पीएफ सहज ट्रान्सफर करता येणार आहे.

Siddhi Hande

EPFO कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी

EPFO 3.0 लवकरच होणार लाँच

पीएफ खात्यातून अवघ्या काही मिनिटांत काढता येणार पैसे

देशातील लाखो कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ईपीएफओ म्हणजे कर्मचारी भविष्य निधी संघटना EPFO 3.0 लाँच करणार आहे. ही नवीन सर्व्हिस सुरु झाल्यानंतर पीएफ खात्यातून पैसे काढणे खूप सोपे आणि जलद होणार आहे. तुम्हाला पीएफमधून पैसे काढण्यासाठी काही दिवसांची वाट पाहण्याची गरज नाही.

तुम्हाला पीएफ काढण्यासाठी ऑनलाइन पोर्टलवर जाऊन फॉर्म भरावा लागत होता. त्यानंतर तुम्हाला कित्येक दिवस पैसे खात्यात येईपर्यंत वाट पाहावी लागत होती. या प्रोसेसमध्ये खूप जास्त वेळ जात होता. परंतु आता EPFO 3.0 मुळे ही सर्व प्रोसेस खूप जलद होणार आहे. तुम्ही थेट एटीएम किंवा यूपीआयद्वारे पैसे काढू शकणार आहात. तुम्ही यूपीआयद्वारे थेट १ लाख रुपये तुमच्या खात्यात ट्रान्सफर करु शकता.

नोकरी बदलल्यावर होतो पीएफ ट्रान्सफर

तुम्ही जर नोकरी बदलली तर तुमचे जुने पीएफ खाते नवीन पीएफ खात्यात ट्रान्सफर होते. यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागतो. यासाठी खूप किचकट प्रोसेस आहे. परंतु आता EPFO 3.0 मुळे तुमचे हे काम खूप जलद होणार आहे. तुम्ही नवीन कंपनी जॉइन करणार तेव्हा नवीन नियोक्त्याच्या पीएफ खात्यात हे खाते लिंक होणार.

अॅप आणि वेबसाइटद्वारे काम होणार सोपे

EPFO च्या वेबसाइट आणि मोबाईल अॅपमध्येही बदल केले जाणार आहेत. यामुळे अनेक गोष्टी सोप्या होणार आहे. पीएफ खात्यातील बॅलेंस चेक करणे, क्लेम स्टेट्‍स चेक करणे किंवा अन्य सुविधांचा उपयोग सोप्या पद्धतीने होणार आहे.

पेन्शनमध्ये सुधारणा

EPFO 3.0 मध्ये पीएफ काढण्यासाठी कोणतीही मर्यादा नाही. परंतु आता पेन्शन सेवा डिजिटल आणि पारदर्शक बनवण्यासाठी ही नवीन सुविधा सुरु केली जाणार आहे. यामध्ये पेन्शनसंबंधित अनेक कामे ऑनलाइन होणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! २ नवी स्थानके लवकरच सुरू होणार; लोकलच्या फेऱ्याही वाढणार

Amravati : अमरावती शिक्षक मतदार संघासाठी निवडणूक; मतदार नोंदणीला सुरवात, राजकीय पक्षांची लगबग

Maharashtra Live News Update: नगर मनमाड महामार्गावर गेल्या चार तासांपासून वाहतूक कोंडी

Dussehra History: नवरात्रीनंतर दसरा का साजरा केला जातो?

Neet ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा टोकाचा निर्णय, स्वत:वर गोळी झाडत आयुष्य संपवलं

SCROLL FOR NEXT