Success Story: ५०० कंपन्यांकडून नकार; पण हार न मानल्यामुळे मिळवली २० लाखांची नोकरी, वाचा प्रेरणादायी कथा

Dhanshri Shintre

२३ वर्षीय तरुण

ईशान्य भारतातील छोट्या गावातील २३ वर्षीय तरुण अभियंत्याला ओपनएआयकडून मोठी संधी मिळाली असून, त्याचा मासिक पगार तब्बल २० लाख रुपये ठरला आहे.

५०० पेक्षा जास्त नोकऱ्यांसाठी अर्ज

२३ वर्षीय तरुण सॉफ्टवेअर इंजिनिअरला आतापर्यंत ५०० पेक्षा जास्त नोकऱ्यांसाठी अर्ज करूनही संधी नाकारली गेली आहे.

संगणक विज्ञानात बीटेक

संगणक विज्ञानात बीटेक पूर्ण केल्यानंतर, त्याने कुटुंबातील पहिला म्हणून कॅम्पस प्लेसमेंटची सुवर्णसंधी मिळवली आहे.

कॅम्पस प्लेसमेंटमध्ये निवड

कॅम्पस प्लेसमेंटमध्ये त्याची निवड वार्षिक ३.६ लाख रुपयांच्या पॅकेजसाठी झाली, मात्र या संधीसाठी त्याला ८ महिने प्रतीक्षा करावी लागली.

नोकरीच्या संधीसाठी अर्ज

८ महिन्यांच्या प्रतीक्षेदरम्यान, त्याने जवळपास ५०० ते ६०० आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधीसाठी अर्ज सादर केले.

अनेक नोकऱ्यांमध्ये नकार

रेडिटवरील पोस्टमध्ये त्याने सांगितले की, महिनोंमहिने नकार मिळाल्यानंतर अखेर त्याला मुलाखतीसाठी कॉल प्राप्त झाला.

पहिल्या मुलाखतीत संधीचा फायदा

पहिल्याच मुलाखतीत त्याने संधीचा फायदा घेत यश मिळवले. त्यानंतर त्याला मिळालेला प्रोजेक्ट हा चॅटजीपीटी निर्माती कंपनी ओपनएआयशी संबंधित ठरला.

दरमहा २० लाख रुपये पगार

या प्रकल्पातून त्याला दरमहा २० लाख रुपयांचा पगार मिळाला. त्यानंतर त्याने मनापासून मेहनत घेतली आणि संपूर्ण क्षमतेने कामगिरी बजावली.

नवा प्रवास सुरू

ऑगस्टमध्ये ओपनएआयचा प्रकल्प पूर्ण झाला, मात्र त्यानंतर त्याचा नवा प्रवास सुरू झाला असून सध्या त्याने स्वतःची स्वतंत्र टेक कंपनी स्थापन केली आहे.

NEXT: पंचधातू अंगठी वापरल्याने शरीराला कोणते फायदे होतात?

येथे क्लिक करा