EPF  Saam Tv
बिझनेस

EPF Calculator: महिन्याला ₹५००० गुंतवा अन् ३.५ कोटींचा फंड मिळवा; वाचा नेमकं कॅल्क्युलेशन

EPF Calculator: ईपीएफमधील गुंतवणूक ही सर्वाधिक सुरक्षित आणि फायद्याची मानली जाते. या योजनेत गुंतवणूक केल्यावर तुम्हाला कोट्यवधी रुपये मिळणार आहे.

Siddhi Hande

EPF मधील गुंतवणूक खूप फायदेशीर

पीएफ अकाउंटमध्ये सर्वाधिक ८.२५ टक्के व्याजदर

दर महिन्याला ५००० रुपये गुंतवून ३.५ कोटी रुपये मिळवू शकणार

संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याचे पीएफ अकाउंट असते. पीएफ अकाउंटमध्ये कर्मचाऱ्याच्या पगारातील ठरावीक रक्कम दर महिन्याला जमा केली जाते. दरम्यान, या अकाउंटमध्ये सर्वाधिक परतावा मिळतो. या योजनेत तुम्ही पैसे गुंतवत असाल तर ती लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट आहे. यामध्ये तुम्ही पैसे गुंतवले तर कोट्यवधी रुपये मिळवू शकतात.

EPF म्हणजे एम्प्लॉय प्रोव्हिडंट फंड.ही एक रिटायरमेंट योजना आहे. ही योजना ईपीएफओद्वारे चालवली जाते.या योजनेत कर्मचाऱ्याच्या बेसिक सॅलरीमधील १२ टक्के रक्कम जमा केली जाते. तर नियोक्त्याद्वारे ३.६७ टक्के योगदान दिले जाते, उरलेले ८.३३ टक्के पेन्शन खात्यात जमा केले जाते.

या योजनेत सरकार दरवर्षी व्याजदर निश्चित केले जाते.सध्या व्याजदर हे ८.२५ टक्के आहे.हे व्याजदर सर्वाधिक आहे.

जर तुमचे सॅलरी ६४,००० रुपये आहे. तर त्यात बेसिक पगार ३१,९०० रुपये असणार आहे. यामध्ये कर्मचाऱ्याचे योगदान ३,८२८ रुपये आहे. नियोक्त्याकडून १,१७२ रुपये जमा केले जातात. म्हणजेच ईपीएफमध्ये दर महिन्याला ५००० रुपये जमा केले जातात.

जर तुमचा पगार वाढला तर ईपीएफमध्ये जमा होणारी रक्कमदेखील वाढली जाते. त्यावर ८.२५ टक्के व्याजदर दिले जाते. या योजनेत जर तुम्ही २५ व्या वर्षी नोकरीला सुरुवात केली आणि वयाच्या ५८ वर्षापर्यंत पीएफ खात्यात पैसे जमा करत असाल म्हणजे ३३ वर्षे तुम्ही गुंतवणूक करु शकतात.

३.५ कोटी मिळवू शकतात

या योजनेत तुम्ही ३३ वर्षात एकूण १.३३ कोटी रुपये जमा करणार आहेत. दरम्यान, यामध्ये व्याज आणि रिटायरमेंटचे पैसे जोडले गेले तर तुम्हाला जवळपास ३.५ कोटी रुपये मिळणार आहेत.ईपीएफमध्ये तुम्हाला पेन्शन आणि इन्श्युरन्सचा फायदा मिळणार आहे. त्यामुळे ही एक सुरक्षित आणि फायदेशीर गुंतवणूक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganga River : देशात ४०० नद्या पण 'या' नदीला राष्ट्रीय महत्त्व का? ९९% लोकांना माहितीच नाही

Maharashtra weather: राज्यात आज कुठे बरसणार पाऊस? ‘या’ ५ जिल्ह्यांना विजांसह पावसाचा अंदाज, हवामान विभागाची माहिती

Tuesday Horoscope : पैशाची चणचण मिटणार, ७ राशींची होणार चांदीच चांदी; वाचा मंगळवारचे राशीभविष्य

Nashik Crime: साधूच्या वेशात सोन्याची लूट, भुरळ पाडून लाखोंचे दागिने लंपास; VIDEO व्हायरल

Radha Patil Dance: राधा पाटलावर गुन्हा, ऐश्वर्याला परवानगी नाकारली; कलाकारांचा बिभत्स डान्स आयोजकांनाही भोवणार

SCROLL FOR NEXT