ED Raids Anil Ambani Companies 
बिझनेस

ED Raid : अंबानींच्या घरी ईडीची धाड, ३००० कोटींच्या घोटाळ्याची चौकशी, ३५ पेक्षा जास्त ठिकाणी छापा

What is the connection between Anil Ambani and Yes Bank scam? : ३००० कोटींच्या येस बँक कर्ज घोटाळ्याप्रकरणी अनिल अंबानी यांच्या कंपन्यांवर ईडीची मोठी कारवाई; मुंबई-दिल्लीतील ५० हून अधिक ठिकाणी छापे.

Namdeo Kumbhar (नामदेव कुंभार)

  • ईडीने ३००० कोटींच्या कथित कर्ज घोटाळ्याप्रकरणी अनिल अंबानी संबंधित कंपन्यांवर छापे टाकले.

  • ही कारवाई येस बँकेकडून दिलेल्या असुरक्षित कर्जाच्या अनियमिततेसंदर्भात आहे.

  • शेल कंपन्यांमध्ये पैसे वळवणं, बनावट कागदपत्र वापरणं आणि लाच देणं याचे पुरावे मिळाले

ED raids Anil Ambani companies in ₹3000 crore Yes Bank fraud : अनिल अंबानी यांच्या कंपन्यांवर ईडीकडून छापेमारी करण्यात आली आहे. ३,००० कोटी रूपयांच्या कथित बँक कर्ज घोटाळ्याची चौकशीसाठी ईडीने ३५ हून अधिक ठिकाणांवर छापेमारी केली. ही कारवाई मनी लाँड्रिंग प्रकरणात आणि येस बँकेकडून २०१७ ते २०१९ दरम्यान मंजूर झालेल्या सुमारे ३,००० कोटी रुपयांच्या कर्जातील कथित अनियमिततांच्या चौकशीसाठी करण्यात आली. ईडीमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही छापेमारी दिल्ली आणि मुंबईत ५० हून अधिक कंपन्या आणि २५ व्यक्तींशी संबंधित परिसरात झाल्या. केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय)ने दाखल केलेल्या दोन एफआयआरच्या आधारे कारवाई सुरू आहे.

येस बँकेने RAAGA कंपन्यांना मोठ्या प्रमाणात असुरक्षित कर्जे दिली होती. त्यामध्ये कर्ज मंजूरीसाठी बँक अधिकाऱ्यांना लाच देण्याचा आणि कर्जाची रक्कम शेल कंपन्यांमध्ये वळवण्याचा संशय आहे. येस बँकेच्या माजी प्रवर्तकांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कर्ज मंजूरीपूर्वी त्यांच्या खासगी खात्यांमध्ये पैसे घेतल्याचे पुरावे ईडीला मिळाले. याशिवाय, कर्ज मंजूरीसाठी बनावट कागदपत्रे, बिन विश्लेषणाचे क्रेडिट प्रस्ताव आणि "लोन एव्हरग्रीनिंग" सारख्या अनियमितता आढळल्या आहेत.

दुसरीकडे, स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) रिलायन्स कम्युनिकेशन्स (RCom) आणि अनिल अंबानी यांना "फसवणूक" खाते म्हणून बाजूला केले आहे. एसबीआयने जून २०२५ मध्ये ही कारवाई केली आणि सीबीआयकडे तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. रिलायन्स होम फायनान्स लिमिटेडच्या कर्ज पुस्तकातही अनियमितता आढळल्याची माहिती सेबीने ईडीला दिली. ही कारवाई मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (PMLA) होत आहे. बँक, गुंतवणूकदार आणि सार्वजनिक संस्थांचा पैसा हडपण्याचा "नियोजित डाव" असल्याचे ईडीचे म्हणणे आहे.

ईडीने अनिल अंबानी यांच्या कोणत्या प्रकरणात छापेमारी केली?

३००० कोटींच्या येस बँक कर्ज घोटाळा व मनी लाँड्रिंग प्रकरणात छापेमारी करण्यात आली आहे.

किती ठिकाणी ईडीने कारवाई केली?

ईडीने मुंबई व दिल्लीतील ५० पेक्षा अधिक ठिकाणी छापेमारी केली आहे.

येस बँकेचा काय संबंध आहे?

येस बँकेने RAAGA कंपन्यांना असुरक्षित कर्ज मंजूर केले होते, ज्यात लाच व शेल कंपन्यांचा वापर झाल्याचा संशय आहे.

कारवाई कुणाच्या एफआयआरवर आधारित आहे?

सीबीआयने दाखल केलेल्या दोन एफआयआरच्या आधारे ईडीने ही कारवाई केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BMC Recruitment: बृहन्मुंबई महानरपालिकेत नोकरीची संधी; या पदांसाठी भरती सुरु; अर्ज कसा करावा?

Mandarmani Beach : पर्यटकांना भुरळ घालणारा मंदारमणी बीच, पावसाळ्यात खुलते सौंदर्य

Amruta Dhongade: अमृताचा बोल्डनेस पाहून तुम्हालाही भरेल हुडहुडी

Param Sundari vs Baaghi 4 : सिद्धार्थ मल्होत्रा अन् टायगर श्रॉफमध्ये कांटे की टक्कर, 'बागी ४'नं ओपनिंग डेलाच केली बक्कळ कमाई

Anant Chaturdashi 2025 live updates : मुंबईच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

SCROLL FOR NEXT