Government Scheme Saam TV
बिझनेस

Government Scheme: फक्त व्याजातून कमवा २४ लाख रुपये; या सरकारी योजनेत मिळते सर्वाधिक व्याज; आजच गुंतवणूक करा

Senior Citizen Saving Scheme: सरकारच्या ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत सर्वाधिक व्याज मिळते. या योजनेत गुंतवणूत केल्यावर तुम्हाला भविष्यात कधीच आर्थिक मदत भासणार नाही.

Siddhi Hande

प्रत्येकजण आपले भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करण्यासाठी वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करत असतात. काही सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक केल्यावर तुम्हाला भविष्यात कधीही आर्थिक मदत भासणार नाही. सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीममध्ये गुंतवणूक केल्यावर तुम्हाला भरघोस परतावा मिळतो. सेवानिवृत्तीनंतर सुरक्षित आणि स्थिर इन्कम मिळवण्यासाठी ही चांगली योजना आहे. (Senior Citizen Saving Scheme)

सेवानिवृत्तीनंतर जर तुम्हाला काही ठरावीक रक्कम जमा करायची असेल तर ही उत्तम योजना आहे. सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीममध्ये सेवानिवृत्त लोकांना ठरावीक परतावा मिळतो.या योजनेत तुम्हाला कोणत्याही रिस्कशिवाय परतावा मिळतो.

सरकारच्या सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीममध्ये सर्वाधिक व्याज मिळते. या योजनेत ८.२ टक्के व्याज मिळते. या योजनेत ज्येष्ठ नागरिकांकडे सेवानिवृत्तीनंतर चांगला फंड जमा होतो. यामुळे त्यांना भविष्यात कोणतीही अडचण येणार नाही. (Government Scheme)

ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत तुम्ही सिंगल आणि जॉइंट अकाउंट उघडू शकतात. या योजनेत तुम्ही १००० ते ३० लाख रुपयांची गुंतवणूक करु शकतात. या योजनेत जास्तीत जास्त १ लाख रुपये कॅश जमा करु शकतात.

या योजनेत तुम्ही दोन खात्यांद्वारे गुंतवणूक केली. तर तुम्ही ६० लाख रुपये गुंतवणार आहात. त्यावर तिमाही आधारावर १,२०,३०० रुपये मिळणार आहे. वार्षिक ४,८१,२०० रुपये मिळणार आहे. त्यानंतर पाच वर्षाच्या मॅच्युरिटी कालावधीनंतर तुम्हाला २४,०६,००० रुपये व्याज मिळणार आहे. त्यामुळे ६० लाखावर तुम्हाला ५ वर्षात २४ लाख रुपये व्याज मिळणार आहे.

या योजनेत जर तुम्ही ३० लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला तिमाही ६०,१५० रुपये व्याज मिळणार आहे. त्यानंतर वार्षिक व्याज २,४०,००० रुपये मिळणार आहे. त्यानंतर तुम्हाला ५ वर्षानंतर १२,०३,००० रुपये व्याज मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Gold Rate: सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी, १० तोळ्याच्या दरात ६००० रुपयांनी घसरण, आजचे दर किती?

Maharashtra Live News Update: संगमनेरमध्ये स्कूल बसला अपघात

Mumbai Police News : आलिशान कारमधून आले अन् टपरी चालकाला उचलून नेलं, मुंबईतील २ पोलिसांना बेड्या

Maharashtra Politics: मीरा-भाईंदरमध्ये भाजपला मोठा धक्का, मराठी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्याचा मनसेत प्रवेश|VIDEO

Abhijeet Khandkekar Wife: फेसबुकवर मैत्री नंतर लग्न केलं; कोण आहे अभिजीत खांडकेकरची पत्नी?

SCROLL FOR NEXT