Finance Saam Tv
बिझनेस

Finance : ७ दिवसात ही ५ कामं कराच, अन्यथा १ एप्रिलपासून बसणार आर्थिक फटका, जाणून घ्या सविस्तर

Do These Finance Related 5 Things Before 31st March: आर्थिक वर्ष लवकरच संपणार आहे. त्यामुळे हे आर्थिक वर्ष संपण्याआधी तुम्हाला काही महत्त्वाची कामे करायची आहेत.

Siddhi Hande

मार्च महिना संपायला अवघे ६ दिवस उरले आहेत. मार्च महिना हा पैशासंबंधित कामांसाठी खूप महत्त्वाचा असतो. मार्च महिना हा आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना असतो. त्यामुळे तुम्हाला अनेक कामे याच महिन्यात करायची आहेत. यामध्ये टॅक्स वाचवण्यापासून ते आयटीआर फाइल करण्यापर्यंत अनेक कामांचा समावेश आहे.

1. टॅक्स सेविंग इन्व्हेसटमेंट

तुम्हाला जर आर्थिक वर्षातील टॅक्स वाचवायचा असेल तर ३१ मार्चपूर्वी वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करा. काही योजनांमध्ये गुंतवणूक केल्यावर तुम्हाला टॅक्स डिडक्शनचा फायदा मिळतो. तुम्हाला आयटीआर फाइल करताना टॅक्स डिडक्शनचा क्लेम करता येणाक आहे. यामुळे तुमच्या १.५ लाखांपर्यंतच्या गुंतवणूकीवर टॅक्स वाचणार आहे.

2. अपडेटेड आयटीआर फाइलिंग

तुम्ही जर मागच्या वर्षी आयटीआर भरताना काही चुक केली असेल तर ती दुरुस्त करण्याची ही शेवटची संधी आहे. तुम्ही ३१ मार्चपासून अपडेटेड आयटीआर फाइल केला आहे. जर तुम्ही जर आर्थिक वर्ष २०२२ मध्ये इन्कम टॅक्स रिटर्न फाइल केले नाही तर ३१ मार्चपर्यंत अपडेटेड आयटीआर फाइल करु शकतात.

3. महिला सन्मान सेविंग सर्टिफिकेट स्कीम

तुम्हाला जर महिला सेविंग सर्टिफिकेट स्कीममध्ये गुंतवणूक करायची असेल तर ३१ मार्च ही शेवटची तारीख आहे. ३१ मार्चनंतर तुम्ही या योजनेत गुंतवणूक करु शकत नाही. या योजनेत ७.५ टक्के व्याजदर मिळते.

4. पीपीएफ आणि सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक

पीपीएफ (PPF) आणि सुकन्या समृद्धी योजनेत (Sukanya Samruddhi Yojana) कमीत कमी रक्कम डिपॉझिट करणे गरजेचे आहे. ही रक्कम आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी जमा करायची आहे. म्हणजे तुम्ही पीपीएफमध्ये ५०० तर सुकन्या समृद्धी योजनेत २५० रुपयांची गुंतवणूक करु शकतात.

5. नवीन आर्थिक वर्षाचं प्लानिंग

तुम्हाला तुमच्या नवीन आर्थिक वर्षाचं प्लानिंग करायचं आहे. म्हणजे नवीन वर्षात कोणत्या योजनेत गुंतवणूक करायची आहे किती गुंतवणूक करायची आहे यासाठी प्लानिंग करणे गरजेचे आहे. त्यामुळे तुम्हाला आयटीआर भरताना अडचणी येणार नाहीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : निलेश गायवळ यावर आत्तापर्यंत १० गुन्हे दाखल

Gulab Jamun Recipe : सणासुदीला खास बनवा रताळ्याचे गुलाबजाम, १० मिनिटांत खाण्यासाठी तयार

Transferred : ऐन दिवाळीत पुणे महापालिकेत खळबळ, सहाय्यक आयुक्तांची उचलबांगडी, तिघांचे निलंबन, नेमकं प्रकरण काय?

Bank Holidays: सोमवारी बँका बंद की सुरू राहणार? वाचा आठवडाभराच्या सुट्ट्यांची यादी

Raghav Juyal : आर्यन खानच्या चित्रपटाने राघव जुयाल झाला मालामाल, ५ मजली आलिशान बंगला बांधतोय

SCROLL FOR NEXT