Gold Rate Today: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोनं स्वस्त, प्रति तोळा इतक्या रुपयांवर आले, वाचा २२ अन् २४ कॅरेटचे दर

Gold-Silver Rate Today Fall: सोनं-चांदीचे दर पुन्हा एकदा घसरले आहेत. सलग दुसऱ्या आठवड्यात सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. त्यामुळे खरेदीदारांना दिलासा मिळाला आहे.
Gold Rate Today
Gold Rate TodaySaam Tv
Published On
Summary

सोने-चांदीचे दर पुन्हा घसरले

सलग दुसऱ्या आठवड्यात सोन्याच्या दरात घट

सर्वसामान्यांना दिलासा

सोनं-चांदी खरेदी करण्यासाठी आनंदाची बातमी आहे. सोन्याचे दर आज पुन्हा एकदा घसरले आहेत.मागचा आठवडाभर सोन्याच्या किंमती घसरल्या होत्या. त्यानंतर आता पुन्हा एकदा सोन्याचे दर घसरले आहेत त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. १ तोळ्यामागे सोन्याचे दर ४९० रुपयांनी घसरले आहेत. त्यामुळे सोनं खरेदी करण्याची ही सुवर्णसंधी आहे, असं म्हणायलाही हरकत नाही. भविष्यात हे दर अजून घसरतील, अशी आशा सर्वसामान्यांना आहे.

Gold Rate Today
Gold Rate Today: आजही सोन्याचे दर घसरले! प्रति तोळा इतक्या रुपयांना मिळणार; वाचा 22k, 24k गोल्डची किंमत

आज सोन्याचे दर कितीने घसरले? (Gold Rate Fall Today)

आज २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे ४९० रुपयांची घसरण झाली आहे. १ तोळ्याचे दर १,५९,१७० रुपये आहेत. ८ ग्रॅममागे सोन्याचे दर ३९२ रुपयांनी घसरले आहेत. हे दर १,२७,३३६ रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे ४,९०० रुपयांची घसरण झाली असून हे दर १५,९१,७०० रुपयेझाले आहेत.

२२ कॅरेटचे दर (22K Gold Rate)

आज २२ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे ४५० रुपयांनी घसरले आहेत. हे दर १,४५,९०० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅममागे सोन्याचे दर ३६० रुपयांनी घसरले आहेत. हे दर १,१६,७२० रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे सोन्याचे दर ४५०० रुपयांनी घसरले आहेत. हे दर १४,५९,००० रुपये झाले आहेत.

Gold Rate Today
Gold Rate Today: गुड न्यूज! सोनं १०,९०० रुपयांनी झालं स्वस्त, तुमच्या शहरातील २४- २२ कॅरेटचे आजचे दर किती?

१८ कॅरेट सोन्याचे दर (18K Gold Rate)

आज १८ कॅरेट सोन्याचे दर ३६० रुपयांनी घसरले आहेत. हे दर १,१९,३८० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅममागे सोन्याचे दर २८८ रुपयांनी घसरले असून ९५,५०४ रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे सोन्याचे दर ३६०० रुपयांची घसरण झाली आहे. हे दर ११,९३,८०० रुपये झाले आहेत.

चांदीचे दर घसरले (Silver Rate Today)

आज चांदीच्या दरातदेखील घसरण झाली आहे. १ किलो चांदीमागे ५००० रुपयांची घसरण झाली आहे. हे दर २,७०,००० रुपये झाले आहेत. १०० ग्रॅम चांदी ५०० रुपयांनी घसरली आहे.

Gold Rate Today
Gold Rate Today: सोनं-चांदीच्या दरात आज वाढ झाली की घसरण? खरेदीला जाण्यापूर्वी वाचा आजचे दर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com