Success Story Of IAS Topper Divya Shakti  
बिझनेस

Success Story : गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडली, दोन वेळा UPSC क्रॅक, दिव्या शक्ती यांचा प्रेरणादायी प्रवास

IAS Topper Divya Shakti : आयएएस दिव्या शक्ती यांनी कठोर परिश्रम यश अन् जिद्दीच्या जोरावर यश मिळवलेय. छोट्या गावात राहणाऱ्या दिव्या शक्ती आज उच्च पदावर कार्यरत आहेत.

Namdeo Kumbhar

Success Story Of IAS Topper Divya Shakti : जिद्द, चिकाटी आणि मेहनत केल्याने कोणत्याही कठीण परिस्थितीचा सामना करत यश मिळवता येते. आपल्याला हव्या असणाऱ्या गोष्टी साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम घ्यावे लागते. निराशा आली तर न खचता प्रयत्न करावे लागतात, प्रमाणिकपणे प्रयत्न करत राहिलात तर यश तुमच्या पायाशी लोटांगण घालतेच. असेच एक उदाहरण आहे, दिव्य शक्ती यांचं.. होय, आयएएस दिव्या शक्ती यांनी कठोर परिश्रम यश अन् जिद्दीच्या जोरावर यश मिळवलेय. छोट्या गावात राहणाऱ्या दिव्या शक्ती आज उच्च पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या यशाची गाथा अनेकांना प्रेरणा देणारी आहे.

दिव्या शक्ती यांनी लागोपाठ दोन वेळा युपीएससी परीक्षा क्रॅक केली. २०१९ मध्ये दिव्या शक्ती यांनी पहिल्यांदा युपीएससी परीक्षेत यश मिळवले, त्यांची रँक होती ७९. त्यांना आयपीएस म्हणून निवडण्यात आले. दिव्या शक्ती यांना त्यावर समाधान नव्हते. त्यांनी पुन्हा तयारी सुरू केली. त्याच जिद्दीने युपीएससीचा अभ्यास केला. २०२२ मध्ये दिव्या शक्ती यांनी पुन्हा युपीएससी क्रॅक केली, त्यावेळी त्यांची रँक होती ५८... दिव्या शक्ती यांनी आयएएस पोस्टिंग देण्यात आली. दिव्या शक्ती यांनी आयएएस होण्यासाठी दिवसरात्र एक केली. आयपीएसची नोकरीही सोडली. त्यांचा प्रवास सोपा नव्हता.

दिव्या शक्ती यांनी बिट्स पिलानी येथून बीटेकचं शिक्षण घेतलेय. इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतल्यानंतर दिव्या यांनी इकॉनॉमिक्समध्ये मास्टर्स पूर्ण केलं. दोन पदव्या मिळाल्यानंतर दिव्यानं नोकरी करण्याचा निर्णय घेतला. चांगल्या कंपनी गलेलठ्ठ पगाराची नोकरी सुरू केली. पैसा, इज्जत, शान, शौकत सर्व काही दिव्याला मिळाले. पण दिव्याला काहीतरी हरवल्यासारखं आणि मन बैचेन झाल्यासारखं वाटत राहिले. काही सिनिअर्सचा सल्ला घेतल्यानंतर दिव्याने UPSC करण्याचा निर्णय घेतला. दिव्याने कोणत्याही तयारीशिवाय UPSCचा पहिल्यांदा पेपर दिला. त्याशिवाय इतर विविध स्पर्धा परीक्षाचे पेपर दिले. पेपर, परीक्षा हे सर्व समजून घेतल्यानंतर ती खऱ्या अर्थाने तयारीला लागली.

आपल्याला यूपीएससीच करायची अन् आयएएस व्हायचेय.. हे दिव्या शक्तीने ठरवले, मनाशी गाठ बांधली अन् तयारी सुरू केली. दिवसरात्र अभ्यास सुरू केला. दिव्याने लागोपाठ दोन वेळा UPSC क्रॅक करत बिहारमध्ये घराघरात नाव पोहचवलं. छोट्या गावातून आलेल्या दिव्या शक्तीचं आज बिहारमध्ये प्रत्येक घरात उदाहरण दिले जातं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: संगमेश्वर माखजन बाजारपेठेला पुन्हा एकदा पुराचा धोका

Ganeshotsav 2025: यंदा गणेशोत्सव कधी आहे? जाणून घ्या तारीख

Khopoli Ghat Traffic : खोपोली घाटात १०० हून अधिक कार थांबल्या, जाणून घ्या धक्कादायक कारण

Mobile Deals: ३००० पेक्षा कमी किंमतीत मोबाईल फोन, YouTube आणि JioHostar पाहण्याची देखील सुविधा

Pune: काय रे तुम्हाला मस्ती आली आहे का? लोखंडी रॉड अन् दगडाने मारहाण; पुण्यात भरचौकात टोळक्यांचा राडा, VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT