Disney+ Hotstar Down Instagram @disneyplushotstar
बिझनेस

Disney Hotstar: नेटफ्लिक्सनंतर डिस्ने प्लस हॉटस्टारचा मोठा निर्णय; पासवर्ड शेअर करण्यासाठी द्यावे लागणार जास्त पैसे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Disney Plus Hotstar Not Allow To Share Password:

सध्या लोकांचा ओटीटी प्लॅटफॉर्मकडे जास्त कल दिसत आहे. चित्रपटगृहात जाण्यापेक्षा अनेकदा लोक घरबसल्या ओटीटीवर चित्रपट पाहण्यास पसंती देतात. यासाठी अॅमेझॉन प्राइम, नेटफ्लिक्स, हॉटस्टार असे अनेक पर्याय आहेत. परंतु आता ओटीटी प्लॅटफॉर्मबाबत डिस्ने प्लस हॉटस्टारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

काही दिवसांपूर्वी नेटफ्लिक्सने अकाउंटचा पासवर्ड शेअर करण्यावर बंदी घातली होती. इतर लोकांसोबत पासवर्ड शेअर करत असाल तर एक्स्ट्रा चार्जेस द्यावे लागायचे. त्यानंतर आता डिस्ने प्लस हॉटस्टारनेदेखील मोठी घोषणा केली आहे. येत्या काही महिन्यांत पासवर्ड शेअरिंग बंद करण्यासाठी हॉटस्टार एका प्लान तयार करणार आहे. (Latest News)

डिस्ने प्लस हॉटस्टारचे अधिकारी ह्यू जॉन्सटन यांनी सांगितले की, डिस्ने प्लस हॉटस्टारने अकाउंटच्या पासवर्ड शेअरिंगला आळा घालण्यासाठी एक नवीन प्रयत्न केला आहे. जर कोणी दुसऱ्याच्या अकाउंटवरुन लॉग इन करत असेल तर त्याला स्वतः चा सबक्रिप्शन साइन अप करण्याचा ऑप्शन मिळेल. यासाठी युजर्सला एक्स्ट्रा चार्ज द्यावे लागणार आहे.

डिस्ने प्लस या रेस्टिक्शनची सुरुवात मार्च २०२४ पासून करेल. यामुळे पासवर्ड शेअरिंग करण्यावर आळा घालता येईल. याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

डिस्ने प्लसचे हे फीचर नेटफ्लिक्सप्रमाणे काम करेल. यामुळे पासवर्ड शेअरिंग करता येणार आहे. घराबाहेर राहण्यास व्यक्तीस जर पासवर्ड हवा असेल तर त्यासाठी एक्स्ट्रा पैसे द्यावे लागतील. यासाठी नेटफ्लिक्सवर सध्या 7.99 डॉलर रुपये आकारले जात आहे. मात्र, डिस्ने प्लस हॉटस्टारने याबाबत कोणतीही माहिती दिली नाहीये.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali Festival: दिवाळीला दारात तेलाचा की तुपाचा दिवा लावावा?

Maharashtra Politics : आणखी एक भाजप आमदार तुतारी हाती घेणार ? महत्वाची माहिती आली समोर

Maharashtra Politics: गडकरी समर्थक असल्यामुळे माझ्यावर कारवाई, नागपूरमधील भाजप नेत्याच्या वक्तव्यामुळे खळबळ

Maharashtra News Live Updates: विधानसभेसाठी पुण्यात मनसेचे उमेदवार तयार?

Bee Attack : शेतात काम करताना मधमाश्यांचा हल्ला; शेतकऱ्याचा मृत्यू, पत्नी जखमी

SCROLL FOR NEXT