DA Hike meta ai
बिझनेस

DA Hike: कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! ₹18,000 बेसिक सॅलरीवाल्यांना दरमहा ₹720 जास्त? 64% DA झाल्यास असे असेल कॅल्क्युलेशन

Central Government Employees : DA ६४ टक्के झाल्यावर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात किती वाढ होईल? १८,००० रुपये, ४४,९०० आणि ५६,१०० रुपये बेसिक सॅलरीवर मिळणाऱ्या अतिरिक्त महागाई भत्त्याचं संपूर्ण कॅलक्युलेशन वाचा.

Sakshi Sunil Jadhav

DA Hike Updates: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्याबाबत (DA) महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. सध्या केंद्रीय कर्मचारी जुलै २०२६ पासून लागू होणाऱ्या महागाई भत्त्याच्या वाढीची वाट पाहत आहेत. AICPI-IW अर्थात अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकाच्या आकडेवारीच्या आधारे यावेळी DA मध्ये ४ टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. मात्र केंद्र सरकारकडून अद्याप याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

जर ४ टक्के वाढ झाली, तर सध्या ६० टक्के असलेला DA ६४ टक्क्यांपर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनानुसार त्यांच्या दरमहा मिळणाऱ्या पगारात थेट वाढ होईल.

१८,००० बेसिक पगार असेल तर किती फायदा होईल?

समजा एखाद्या कर्मचाऱ्याची बेसिक सॅलरी ही १८,००० रुपये आहे. सध्या ६० टक्के DA नुसार त्याला दरमहा १०,८०० रुपये महागाई भत्ता मिळतो. DA ६४ टक्के झाल्या तर ही रक्कम ११,५२० रुपये होईल. म्हणजेच दरमहा ७२० रुपये जास्त मिळतील.

४४,९०० रुपये बेसिक पगारावर किती वाढ?

ज्या कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी ४४,९०० रुपये आहे, त्यांचा सध्याचा ६० टक्के DA २६,९४० रुपये आहे. ६४ टक्के DA झाल्यावर तो २८,७३६ होईल. म्हणजेच दरमहा १,७९७ रुपयांची वाढ होऊ शकते.

५६,१०० रुपये बेसिक सॅलरी असल्यास?

५६,१०० रुपये बेसिक सॅलरी असलेल्या कर्मचाऱ्यांना सध्या ६० टक्के DA नुसार ३३,६६० रुपये मिळतात. DA ६४ टक्के झाल्यावर ही रक्कम ३५,९०४ होईल. म्हणजेच दरमहा २,२४४ रुपये जास्त मिळू शकतात.

दरम्यान, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या संघटनांकडून DA आणि DR वाढीची घोषणा लवकर करण्याची मागणी केली जात आहे. अंतिम निर्णय मात्र केंद्र सरकारच्या अधिकृत घोषणेनंतरच स्पष्ट होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT