

PM Kisan 24th Installment: तुम्ही शेतकरी असाल आणि पीएम किसान योजनेचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. सध्या शेतकरी २४ व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. येत्या ऑक्टोबर महिन्यात केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना हप्त्याची भेट मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, कृषी मंत्रालयाकडून अद्याप २४ व्या हप्त्याच्या हस्तांतरणाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे दसऱ्याआधी पैसे मिळतील का, याबाबत शेतकऱ्यांनी अधिकृत अपडेटची प्रतीक्षा करणं आवश्यक आहे.
पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ६,००० रुपये दिले जातात. ही रक्कम तीन समान हप्त्यांमध्ये थेट बँक खात्यात जमा केली जाते. एप्रिल ते जुलै, ऑगस्ट ते नोव्हेंबर आणि डिसेंबर ते मार्च या कालावधीत हप्ते वितरित केले जातात.
दिलेल्या माहितीनुसार, योजनेचा २३ वा हप्ता जूनमध्ये वितरित करण्यात आला होता. आता २४ वा हप्ता ऑक्टोबरमध्ये येण्याची शक्यता व्यक्त केली जात असली तरी, निश्चित तारीख अद्याप जाहीर झालेली नाही.
पीएम किसानचा लाभ मिळवण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण केलेली असणं महत्ताचं आहे. ई-केवायसी रखडलेली असेल तर अधिकृत पोर्टलवरून प्रोसेस पूर्ण करा. त्यासाठी सर्वात आधी pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जा. पुढे ‘e-KYC’ पर्यायावर क्लिक करा. मग आधार कार्ड नंबर आणि नोंदणीकृत मोबाइलवर आलेला OTP वापरून प्रोसेस पूर्ण करा. शेतकरी जवळच्या CSC केंद्रावर बायोमेट्रिक ई-केवायसी सुद्धा करू शकतात. पीएम किसान अॅपद्वारे फेस ऑथेंटिकेशनची सुविधाही उपलब्ध आहे.
पीएम किसानच्या वेबसाइटवर जाऊन Farmers Corner - Beneficiary List निवडा. राज्य, जिल्हा, तहसील, ब्लॉक आणि गावची माहिती भरल्यानंतर यादीत आपलं नाव तपासा. तसेच Know Your Status पर्यायातून हप्त्याची स्थिती पाहता येते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.