Gold Rate Today : सोनं अचानक स्वस्त! आठवडाभरात ₹10,000 ची घसरण, आजचा भाव किती? वाचा...

Gold and Silver Prices Fall: आठवड्याभरात सोन्याच्या दरात मोठी घसरण झालेली पाहायला मिळाली आहे. सोन्याच्या दरात ३,१६० रुपयांपर्यंत घसरण कर चांदीच्या किंमतीत १०,००० प्रति किलोची घसरण झाली आहे.
Gold and Silver Prices Fall
Gold Price DropSaam Tv
Published On: 

सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. आठवड्याभरात सोन्याच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात घसरण पाहायला मिळाली आहे. विविध शहरांमध्ये एका आठवड्यापासून २४ कॅरेट सोन्याच्या किंमतीत ३१६० रुपयांनी घसरण झालेली आहे. तर २२ कॅरेट सोनं २९०० रुपयांनी स्वस्त झालं आहे. आज दिनांक २६ सप्टेंबर रोजी मुंबईत १५२६८० रुपये १ तोळं सोन्याची किंमत आहे. तर दिल्लीमध्ये २४ कॅरेट १ तोळं सोन्याची किंमत १५२८३० रुपये आहे. देशांतर्गत सराफा बाजारातही सोनं-चांदीच्या दरात साप्ताहिक पातळीवर मोठी घसरण झाली आहे.

चेन्नई आणि अहमदाबादमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर १,५२,७३०, तर २२ कॅरेट सोन्याचा दर १,४०,००० रुपये आहे. पुणे आणि बंगळुरूमध्ये २४ कॅरेट सोन्याचा भाव १,५२,६८०, तप २२ कॅरेटचा दर १,३९,९५० रुपये आहे.

Gold and Silver Prices Fall
Tata Aeris Launched: खुशखबर! ₹5.29 लाखांत आली टाटाची नवी कार, फीचर्सही जबरदस्त

चांदीच्या दरातही मोठी घसरण

सोन्याबरोबरच चांदीच्या किमतीतही आठवड्याच्या आधारावर मोठी घसरण झाली आहे. एका आठवड्यात चांदी सुमारे १०,००० प्रति किलोने स्वस्त झाली असून, २७ सप्टेंबरच्या सकाळच्या दरानुसार चांदीचा भाव २,४५,००० प्रति किलोग्रॅम आहे.

Gold and Silver Prices Fall
HDFC Bank : रविवारी बँक सुरू राहणार HDFC बँकेने दिली मोठी अपडेट, वाचा कारण

आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट गोल्डचा भाव ४,२८२.९८ प्रति औंस असून, एका आठवड्यात त्यात २.१ टक्क्यांची कमजोरी आली आहे. स्पॉट सिल्व्हरचा दर ६४.२६ प्रति औंस आहे. दरम्यान, जेफरीजचे ग्लोबल हेड ऑफ इक्विटी स्ट्रॅटेजी क्रिस वुड यांनी सोन्याचा भाव भविष्यात १०,००० प्रति औंसपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त केली आहे. याच वर्षी जानेवारीत देशांतर्गत चांदीचा भाव ४ लाख प्रति किलोच्या विक्रमी पातळीवर पोहोचला होता. त्यानंतरच्या तुलनेत चांदीच्या दरात आतापर्यंत ४० टक्क्यांची घसरण झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com