HDFC Bank : रविवारी बँक सुरू राहणार HDFC बँकेने दिली मोठी अपडेट, वाचा कारण

Bank Strike: २८ ते ३० सप्टेंबरच्या तीन दिवसांच्या बँक संपाच्या पार्श्वभूमीवर HDFC Bank २७ सप्टेंबरला रविवारी शाखा सुरू ठेवणार आहे.
Bank Strike
Bank Strikemeta ai
Published On: 

बँक ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. २८ सप्टेंबर ते ३० सप्टेंबरदरम्यान जाहीर करण्यात आलेल्या तीन दिवसांच्या बँक संपाच्या पार्श्वभूमीवर HDFC Bank ने रविवारी, २७ सप्टेंबर रोजी आपल्या शाखा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ग्राहकांची गैरसोय होऊ नये, यासाठी बँकेने हा निर्णय घेतल्याची माहिती आहे.

HDFC Bank ने याबद्दल आपल्या ग्राहकांना ई-मेलद्वारे माहिती दिली आहे. शनिवारी रात्री पाठवण्यात आलेल्या या ई-मेलमध्ये २७ सप्टेंबर रोजी बँकेच्या शाखा सुरू राहतील, असं स्पष्ट करण्यात आलं आहे.तसेच २८ सप्टेंबर सोमवार ते ३० सप्टेंबर बुधवारपर्यंत शाखांमध्ये नियमित कामकाज सुरू राहील, अशी माहितीही बँकेने दिली आहे. कर्मचाऱ्यांनाही याबाबत पूर्वसूचना देण्यात आली आहे.

Bank Strike
Guava vs Banana: पेरू की केळी? कोणतं फळ खाल्ल्याने मिळतं जास्त पोषण

दरम्यान, सरकारी बँका आणि क्षेत्रीय ग्रामीण बँका (RRB) यांनीही तीन दिवसांच्या संपामुळे ग्राहकांना होणारी संभाव्य गैरसोय लक्षात घेऊन २७ सप्टेंबरला शाखा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. २८ ते ३० सप्टेंबरदरम्यान बँक कर्मचाऱ्यांच्या संपाचा परिणाम शाखांच्या कामकाजावर होण्याची शक्यता आहे.

Bank Strike
Supreme Court Railway Ticket : ट्रेनमधून पडून मृत्यू झालेल्या व्यक्तींना मिळणार नुकसानभरपाई, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

याआधी २६ सप्टेंबर हा महिन्याचा चौथा शनिवार असल्याने बँकांना सुट्टी आहे. त्यानंतर २७ सप्टेंबर रविवारची नियमित सुट्टी असली तरी संपाच्या पार्श्वभूमीवर काही बँकांनी विशेषतः शाखा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ग्राहकांना सलग सुट्ट्यांमुळे होणारा त्रास काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे.

युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU) या बँक कर्मचारी संघटनांच्या छत्री संघटनेने २८ ते ३० सप्टेंबरदरम्यान तीन दिवसांच्या संपाची हाक दिली आहे. बँक कर्मचाऱ्यांची आठवड्यात पाच दिवस कामकाजाची मागणी हा या आंदोलनातील प्रमुख मुद्दा आहे. संघटनांच्या म्हणण्यानुसार, सरकारने याबाबत आश्वासन दिलं होतं; मात्र सरकारने असं कोणतंही आश्वासन दिलं नसल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे २७ सप्टेंबरला शाखा सुरू ठेवण्याचा निर्णय ग्राहकांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com