Sakshi Sunil Jadhav
पेरू आणि केळ्यांमध्ये जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबरचे प्रमाण जास्त असतं.
पेरू आणि केळी एकत्र खाल्ल्याने प्रत्येक व्यक्तीला त्रास होतो, असा काही ठोस पुरावा नाही.
पेरूमध्ये व्हिटॅमिन C मोठ्या प्रमाणात असल्याने रोगप्रतिकारक शक्तीसाठी तो चांगला ऑप्शन ठरतो.
केळ्यामध्ये पोटॅशियम मुबलक प्रमाणात असतं, त्यामुळे रोजच्या आहारात ते फायदेशीर ठरू शकतं.
पेरूमध्ये जास्त फायबर असल्यामुळे पचनक्रिया सुरळीत ठेवायला मदत होऊ शकते.
केळ्यामध्ये नैसर्गिक कार्बोहायड्रेट्स असल्याने व्यायामाआधी किंवा नंतर झटपट ऊर्जा मिळवण्यासाठी ते सोयीचं आहे.
फायबरचे प्रमाण तुलनेने जास्त असल्यामुळे पेरू खाल्ल्यानंतर जास्त वेळ पोट भरल्यासारखे वाटू शकते.
पेरू आणि केळीमध्ये विविध जीवनसत्त्वे व अँटिऑक्सिडंट घटक असल्याने संतुलित आहाराचा भाग म्हणून दोन्हींचा फायदा होऊ शकतो.
व्हिटॅमिन C आणि फायबरसाठी पेरू, तर पोटॅशियम आणि झटपट ऊर्जेसाठी केळी निवडणे अधिक योग्य ठरू शकते.