DA Hike Saam Tv
बिझनेस

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! महागाई भत्ता ६० टक्क्यांपर्यंत वाढणार? जाणून घ्या कधीपासून लागू होणार

DA Hike Expected: केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. लवकरच महागाई भत्ता वाढण्याची शक्यता आहे. हा महागाई भत्ता ३ टक्क्यांनी वाढू शकतो.

Siddhi Hande

केंद्र सरकार लवकरच कर्मचाऱ्यांचा आणि महागाई भत्त्यात वाढ करणार आहे. जुलै २०२५ पासून हा महागाई भत्ता वाढला जाणार आहे. महागाई भत्त्यात जवळपास ३ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. ही वाढ जरी जुलैपासून होणार असली तरीही याची घोषणा होण्यास अजून वेळ आहे. ही घोषणा सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता आहे.

सरकार दरवर्षी दोनदा महागाई भत्त्यात वाढ करते. १ जानेवारी आणि १ जुलैपासून हा DA/DR वाढणार आहे. याबाबत अधिकृत घोषणा लवकरच होईल. याचसोबत १ जानेवारीपासून वाढणारा महागाई भत्ता मार्चपासून देण्यात येतो. १ जुलैपासून वाढणारा महागाई भत्ता सप्टेंबर- ऑक्टोबरपासून लागू होईल.

जुलै २०२५ मध्ये महागाई भत्ता ३ टक्क्यांनी वाढणार आहे. सध्या महागाई भत्ता ५५ टक्के आहे. हा वाढून ५८ टक्के होण्याची शक्यता आहे.

महागाई भत्ता कसा ठरवला जातो? (DA Hike Calculation)

महागाई भत्ता अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक- औद्योगिक कामगार (AICPI-IW) च्या आधारे केली जाते. मार्च २०२५ मध्ये हा निर्देशांक १४३ होता, जो आता १४४ झाला आहे. जर हा निर्देशांक असाच वाढत राहिला तर महागाई भत्त्यात ३ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता असते.

सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजाणीपासून महागाई भत्ता सातत्याने वाढत आहे. जुलैमध्ये हा दर ३ टक्क्यांनी वाढ होऊ शकते. त्यानंतर जानेवारी २०२६ मध्ये महागाई भत्ता २ टक्क्यांनी वाढू शकतात. त्यामुळे हा दर पुढच्या वर्षी ६० टक्के होऊ शकतो.

आठवा वेतन आयोग कधीपासून लागू होणार? (When Will 8th Pay Commission Implement)

आठवा वेतन आयोग (8th Pay Commission) हा लवकरच लागू केला जाणार आहे. जानेवारी २०२६ पासून हा वेतन आयोग लागू होणार आहे. यावेळी महागाई भत्ता आणि आठव्या वेतन आयोगाबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. मूल पगार आणि महागाई भत्ता विलीन होण्याची शक्यता आहे. याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कफ परेडला जाणाऱ्या मेट्रोचे दरवाजे बंद होईना, प्रवाशांचे हाल

जीमला जाण्यापूर्वी प्रत्येकाने या मेडिकल टेस्ट करून घ्याव्यात, हार्ट अटॅकचा धोका टळेल

शिवसेना मनसेच्या जागावाटपाचं सूत्र ठरलं, कोणत्या वार्डातून कोणाचा उमेदवार?

Watches Design: डेली ऑफिस वेअरसाठी हातात घाला 'हे' युनिक डिझाइनचे वॉच; प्रोफेशनल लूक दिसेल क्लासी!

भाजपचा डाव काँग्रेसच्या जिव्हारी, २ माजी आमदारांनी घेतलं कमळ, शेकडो समर्थकांनी सोडली साथ

SCROLL FOR NEXT