
सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच खुशखबर मिळणार आहे. सरकार लवकरच महागाई भत्त्याची घोषणा करणार आहे. जुलै महिन्यापासून महागाई भत्ता वाढणार आहे. हा भत्ता लवकरच लागू केला जाणार आहे. मिडिया रिपोर्टनुसार, केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (Dearness Allowance) ५८ टक्के होऊ शकतो. याबाबतची घोषणा ऑगस्ट महिन्यात होऊ शकते.
किती वाढणार महागाई भत्ता? (How Much DA Hike For Government Employees)
मे २०२५ मध्ये(AICPI-IW) 0.5 अंकानी वाढवून १४४ झाला आहे. मार्च ते मे महिन्यात हा इंडेक्स वाढत आहे. मार्च मध्ये हा १४३ होता. मे महिन्यात १४४ झाला आहे. AICPI-IW च्या आधारावरच महागाई भत्त्यात वाढ होते. यामुळेच जुलै महिन्यात महागाई भत्त्यात ३ ते ४ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे.
सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (Dearness Allowance) हा ५५ टक्के आहे. जुलै महिन्यापासून वाढणारा महागाई भत्ता हा जून २०२५ च्या AICPI-IW वर निर्भर असणार आहे. याबाबतचा डेटा ऑगस्ट महिन्यात जारी केला जाईल. जर महागाई भत्त्यात ३ टक्क्यांनी वाढ केली तर महागाई भत्ता ५८ टक्के होणार आहे. जर महागाई भत्त्यात ४ टक्क्यांनी वाढ झाली तर तो ५९ टक्के होणार आहे.
महागाई भत्त्याची घोषणा कधी होणार?
जून २०२५ च्या CPI-IW चा डेटा जुलै महिन्याच्या शेवटी किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात येईल. यावरच आधारित महागाई भत्ता निश्चित केला जाईल. त्यामुळे हा भत्ता जुलै महिन्यापासून वाढवला जाणार आहे. जेव्हा हा भत्ता लागू होईल तेव्हा जुलैपासूनचे पैसे कर्मचाऱ्यांच्या पगारात येईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.