DA News: निवृत्त कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता मिळणार नाही? जाणून घ्या व्हायरल मेसेजमागचं सत्य

DA News Viral Message Fact Check: सध्या सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होत आहे. त्यामध्ये निवृत्त कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता मिळणार नसल्याचा दावा करण्यात येत आहे.
DA News
DA NewsSaam Tv
Published On

निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना आता डीए मिळणार नाही असा दावा करणारा मेसेज व्हायरल होतोय...यामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालाय.असा अचानक का निर्णय घेण्यात आलाय...खरंच या दाव्यात तथ्य आहे का.? कारण, देशभरात लाखो निवृत्त कर्मचाऱ्यांना डीए, पेन्शन सरकारी सेवा मिळतात.त्यामुळे आम्ही याची पडताळणी सुरू केली...त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात...

DA News
SBI SIP Scheme: महिन्याला २५० रुपये गुंतवा अन् ७८ लाख रुपये मिळवा; स्टेट बँकेच्या SIP मुळे व्हाल मालामाल

निवृत्त कर्मचाऱ्यांना डीए मिळणार नाही? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

केंद्र सरकारने वित्त कायदा 2025 अंतर्गत निवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांसाठी डीए वाढ आणि वेतन आयोग सुधारणा यांसारखे निवृत्तीनंतरचे फायदे बंद करण्याचा निर्णय घेतलाय.

हा मेसेज व्हायरल झाल्याने आम्ही याची पडताळणी सुरू केली...डीए म्हणजे महागाई भत्ता...यासंदर्भात माहिती सरकारकडून मिळू शकते...त्यामुळे आमच्या टीमने या मेसेजची पडताळणी करण्यासाठी सरकारकडून माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला...यावेळी आम्हाला काही माहिती हाती लागली...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...

निवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांसाठी डीए सुरूच राहणार

मात्र, सगळ्यांच निवृत्त कर्मचाऱ्यांना डीए मिळणार नाही असा दावा आमच्या पडताळणीत असत्य ठरलाय...सीसीएस पेन्शन कायदा 2021 मधील नियम 37 मध्ये सुधारणा करण्यात आल्याय...त्यानुसार कर्मचाऱ्याला गैरवर्तनासाठी काढून टाकले असल्यास निवृत्तीवेतनाचे लाभ मिळणार नाहीत...त्यामुळे सर्व सेवानिवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांवर याचा परिणाम होत नाही...

DA News
ELI Scheme: EPFO चा लाखो कर्मचाऱ्यांना दिलासा! UAN अ‍ॅक्टिव्ह करण्याची डेडलाइन वाढवली

सोशल मीडियावर रोज असे अनेक मेसेज व्हायरल होत असतात. मात्र, यातील अनेक मेसेज हे फसवणूक करणारे आहेत. त्यात काहीही तथ्य नसते. त्यामुळे नागरिकांनी या अशा मेसेजवर लक्ष ठेवू नये.आधी त्यांनी फक्त अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा, असं सांगितलं जात आहे.

DA News
DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! महागाई भत्ता वाढणार, १ जुलैपासून होणार लागू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com