
सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच खुशखबर मिळणार आहे. लवकरच कर्मचाऱ्यांसाठी ८वा वेतन आयोग लागू होणार आहे.यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर फिटमेंट फॅक्टरबाबत अनेक चर्चा होत आहे. मिडिया रिपोर्टनुसार, फिटमेंट फॅक्टर हा १.९२, २.०८ किंवा २.८६ वाढू शकतो. त्यामुळे कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढणार हे फिटमेंट फॅक्टरवर अवलंबून असते. जर फिटमेंट फॅक्टर २.८६ टक्के वाढला तर बेसिक सॅलरी १८००० रुपयांवरुन ५१,४८० रुपये होणार आहे. वेगवेगळ्या फिटमेंट फॅक्टरनुसार कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ होणार आहे.
देशात २०२६ च्या सुरुवातीला ८वा वेतन आयोग लागू होण्याची शक्यता आहे. नरेंद्र मोदींनी वेतन आयोगाना मंजुरी दिली आहे. यासाठी अध्यक्ष आणि दोन सदस्यांची समिती स्थापन केली जाणार आहे.मात्र, ही समिती कधी स्थापन केली जाणार याबाबत कोणतीही अपडेट समोर आली नाही.
ही तीन सदस्यीय समिती सॅलरी आणि पेन्शबाबत रिसर्च करणार आहे. त्यानंतर रिपोर्ट करणार आहे. यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांची सॅलरी आणि पेन्शन ठरवली जाणार आहे.
७ व्या वेतन आयोगाअंतर्गत फिटमेंट फॅक्टर २.५७ होती. यानुसार कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी ७००० रुपयांवरुन वाढून १८००० करण्यात आली होती. यावेळी कदाचित फिटमेंट फॅक्टर १.९२ ते २.८६ पर्यंत केला जाऊ शकतो.
लेव्हल १ कर्मचारी
जर बेसिक सॅलरी १८००० असेल तर १.९२ फिटमेंट फॅक्टरनुसार ३४५६० रपये बेसिक सॅलरी मिळणार आहे. २.०८ फिटमेंट फॅक्टरमध्ये ३७,४४९ रुपये पगार मिळणार आहे. २.८६ फिटमेंट फॅक्टरमध्ये ५१,४८० रुपये बेसिक सॅलरी मिळणार आहे.
लेव्हल २ कर्मचारी
१.९२ फिटमेंट फॅक्टरनुसार ३८,२०८ रुपये पगार मिळणार आहे. २.०८ नुसार ४१,३९२ बेसिक सॅलरी मिळणार आहे. १.८६ नुसार ५६९१४ बेसिक सॅलरी मिळणार आहे,
लेव्हल ३ कर्मचारी
१.९२ फिटमेंट फॅक्टरनुसार ४१,६६४ रुपये सॅलरी मिळणार आहे. २.०८ नुसार ४५,१३६ पगार मिळणार आहे. २.८६ नुसार ६२,०६२ रुपये पगार मिळणार आहे.
लेव्हल ४
१.९२ नुसार २५,५०० रुपये पगार मिळणार आहे. २.०८ नुसार ५३,०४० रुपये बेसिक सॅलरी होणार आहे. तर २.८६ नुसार ७२,९३० रुपये पगार होणार आहे.
लेव्हल ५
१.९२ फिटमेंट फॅक्टरनुसार बेसिक सॅलरी ५६,०६४ रुपये होणार आहे. २.०८ नुसार ६०,७३६ रुपये पगार होणार आहे. २.८६ नुसार ८३,५१२ रुपये होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.