Yash Shirke
भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचा सहकारी बुच विल्मोरसह अंतराळात आहेत.
त्यांना पृथ्वीवर आणण्यासाठीचे प्रयत्न सुरु आहेत. १९ मार्च पूर्वी ते स्पेसएक्स ड्रॅगन अंतराळयानातून परत येणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
सुनीता नऊ महिन्यांपासून अंतराळात आहेत. त्यांना अंतराळात राहण्यासाठी किती पैसे मिळणार याबाबतच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
नासाचे निवृत्त अंतराळवीर कॅडी कोलमन यांनी दिलेल्या माहितीनुसार, अंतराळवीर यांना ओव्हरटाईमचा विशेष पगार नसतो.
अंतराळात असतानाही त्यांना पृथ्वीइतकेच वेतन दिले जाते. नासा फक्त त्यांच्या जेवणाचा आणि आयएसएसवरील खर्च देते.
पगार सोडून अंतराळवीरांना प्रतिदिनी ५ डॉलर्स (३४७ रुपये) इतका भत्ता दिला जातो.
विल्यम्स आणि विल्मोर यांना प्रत्येकी ११४८ डॉलर्स (१ लाख रुपये) अधिकचा भत्ता मिळेल.
९ महिने अंतराळात राहिल्यानंतर विल्यम्स आणि विल्मोर यांनी अतिरिक्त भत्त्यासह ९४,९९८ डॉलर ते १,२३,१५२ डॉलर (अंदाजे ८२ लाख रुपये ते १.०६ कोटी रुपये) इतके पैसे मिळू शकतील.
Next : औरंगाबाद नाही तर 'हे' होतं छत्रपती संभाजीनगरचं पूर्वीचं नाव, काय आहे इतिहास? वाचा..