CNG Price Cut Saam Tv
बिझनेस

CNG Price Cut: नवीन वर्षात खुशखबर! CNG आणि PNG च्या किंमती झाल्या कमी; किती होणार फायदा?

CNG and PNG Price Cut: २०२६ म्हणजेच नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सर्वसामान्यांना गिफ्ट मिळणार आहे. सीएनजी आणि पीएनजीच्या किंमती कमी होणार आहे.

Siddhi Hande

नवीन वर्षात सर्वसामान्यांना गिफ्ट

सीएनजी आणि पीएनजीच्या किंमती कमी होणार

केंद्र सरकारचा मोठा निर्णय

नवीन वर्षात सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट मिळणार आहे. २०२६ मध्ये गॅसच्या किंमती कमी होणार आहे. सीएनजी आणि घरगुती पीएनजी गॅसचे दर कमी होणार आहे. दरम्यान, पेट्रोलियम आणि नॅचरल गॅस रेग्युलेटरी बोर्ड (PNGRB) ने टॅरिफ रॅशनलायजेशनची घोषणा केली आहे. हे १ जानेवारी २०२६ पासून लागू होणार आहे. त्यामुळे नवीन वर्षात हे दर कमी होणार आहे.

वाहनधारक ते गृहिणींना फायदा

नुकत्याच एका इंटरव्ह्यूमध्ये PNGRB चे सदस्य ए.के. तिवारी यांनी सांगितले की, नवीन युनिफाइड टॅरिफ स्टॅक्चरमुळे ग्राहकांना राज्य आणि सध्याच्या टॅक्सच्या आधारावर प्रति युनिट २-३ रुपयांची सूट मिळणार आहे. यामुळे वाहनधारकांपासून ते गृहिणींना फायदा होणार आहे.

सीएनजी आणि पीएनजीच्या किंमती कमी होणार (CNG And PNG Price Drop)

आता टॅरिफच्या झोनची संख्या दोनवरुन तीन केली आहे. यामुळे टॅरिफ स्ट्रॅक्चर खूप सोपे झाले आहे. २०२३ च्या प्रणालीअंतर्गत हे तीन विभागात विभागले होते. २०० किलोमीटपर्यंत ४२ रुपये, ३००० ते १२००० किमीसाठी ८० रुपये तर १२०० किमीपेक्षा जास्त अंतरासाठी १०७ रुपये ठरवून देण्यात आले होते. आता हे फक्त दोन झोन केले आहेत. यामध्ये एक झोन सीएनजी आणि दुसरा झोन घरगुती पीएनजी ग्राहकांना लागू होईल. म्हणजेच नवीन प्रणालीअंतर्गत झोन १ साठी ५४ रुपये दर निश्चित केला आहे.

सर्वसामान्यांना दिलासा

या नवीन टॅरिफ रचनेत ४० शहर गॅस वितरण कंपन्यांचा समावेश आहे. याबाबत तिवारी यांनी सांगितले की, यामुळे वाहतूक क्षेत्रात सीएनजी वापरणाऱ्यांना आणि घरगुती पीएनजी वापरणाऱ्यांना फायदा होईल. कमी दरांचे फायदे ग्राहकांना मिळवून द्यावेत, असे निर्देश सरकारने दिले आहे. यामुळे नियामक मंडळ लक्ष ठेवेल, असं त्यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

https://saamtv.quintype.com/story/d86ac51e-b354-4ca2-8d75-93946c83e994

Jamkhed Hotel Firing: ...तो रोहित पवार मी नाहीच! जामखेड गोळीबार घटनेनंतर आमदार रोहित पवार म्हणाले, Don’t Worry..! I am Fine!

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंची विकेट पडली; आता नंदुरबारचा पालकमंत्री कोण? या ५ मंत्र्यांची नावं चर्चेत

पंढरपुरातील विठ्ठल मूर्तीच्या चरणांची झीज; वज्रलेपासाठी परवानगी रखडली|VIDEO

एक कॅप्सूल, पाण्याचं पेट्रोल? पेट्रोलसाठी पंपावर जाण्याची गरज नाही?

SCROLL FOR NEXT