Sakshi Sunil Jadhav
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओत वाहनचालकांना धक्का बसेल अशी गोष्ट सांगितली आहे. पेट्रोल पंपावर धोका कसा दिला जातो? याबाबत पंप कर्मचाऱ्यानेच मोठे खुलासे केले आहेत.
पंपावरील कर्मचाऱ्याने सांगितले की, पंप कर्मचारी मीटर '0' दाखवूनसुद्धा ग्राहकाला फसवू शकतात. त्यामुळे फक्त '0' पाहणे पुरेसं नाही.
व्हिडिओमध्ये दाखवल्यानुसार, मीटर 0 पासून थेट 5 वर जातो पण त्या वेळेस प्रत्यक्ष फ्यूल फ्लो होत नाही. यामुळे ग्राहकाचे काही मिलीलीटर पेट्रोल 'कट' होतं.
पेट्रोल पुन्हा सुरू होण्यापूर्वी मशीन काही सेकंद काम करत नसते. हाच काळ फसवणुकीसाठी वापरला जातो.
प्रत्येक पंपावर एक स्क्रीन असते जेथे ईंधनाची डेंसिटी दिसते. ती प्रत्येक वेळी तपासणे महत्वाचे असते. पेट्रोल डेंसिटी 720 ते 775,डिझेल डेंसिटी 820 ते 860 ही रेंज नसेल तर इंधनात भेसळ असण्याची शक्यता जास्त असते.
डेंसिटी स्टँडर्डपेक्षा कमी किंवा जास्त असल्यास पंप अधिकाऱ्यांना प्रश्न विचारा किंवा तक्रार नोंदवा.
कर्मचाऱ्याच्या मते योग्य परिस्थितीत मीटर 2,3 किंवा 4 वर यायला हवा. त्यापेक्षा जास्त असेल तर ते स्पष्टपणे गैरप्रकाराचे चिन्ह आहे.
लोक फक्त 0 पाहतात पण पुढची रीडिंग पाहत नाहीत. असा निष्काळजीपणा फसवणुकीचे मुख्य कारण ठरते.