Sakshi Sunil Jadhav
अलीकडे महाराष्ट्रात बिबट्याचा वावर वाढताना दिसत आहे. ग्रामीण आणि शहराच्या सीमेवरील भागात लोकांना सतत सावध राहण्याची गरज आहे.बिबट्याच्या हल्ल्यापासून स्वतःला आणि कुटुंबाला कसं सुरक्षित ठेवावं, याबाबत महत्त्वाच्या टिप्स समोर आल्या आहेत.
बिबट्या रात्री जास्त सक्रिय असतो. त्यामुळे रात्री किंवा पहाटे एकट्याने बाहेर जाणं टाळा.
बिबट्या लहान मुलांवर सहज हल्ला करू शकतो. घराबाहेर खेळताना त्यांच्यावर लक्ष ठेवा.
झाडी, बांबू, शेती किंवा निरव वातावरणातल्या ठिकाणी जाताना आजूबाजूला नीट पाहत जा.
पळाल्यावर बिबट्याला शिकार असल्याचा भास होतो. शक्य तितके शांत रहा आणि हळूहळू मागे सरका.
जंगली प्राणी अचानक हालचालीवर हल्ला करतात. म्हणून त्याच्यावर नजर ठेवत सावकाश अंतर वाढवत मागे या.
बिबट्या माणसाचा आवाज आणि प्रकाशात यायला टाळतो. टॉर्च, मोबाइल लाईट किंवा काठीवर घंटी बांधून घ्या.
कुत्रे भुंकल्यामुळे बिबट्याचा राग वाढतो आणि तो गावातही घुसू शकतो.
मांसाचा वास येणाऱ्या ठिकाणी बिबट्या येण्याची शक्यता वाढते. त्यामुळे परिसर स्वच्छ ठेवा.