Sakshi Sunil Jadhav
आजकालच्या धावपळीच्या आणि बिझी लाईफमध्ये लोक घरापेक्षा जास्त वेळ ऑफिसमध्ये घालवतात. एकत्र काम करताना लोकांमध्ये जवळीक वाढते आणि मैत्री काही वेळा प्रेमसंबंधातही बदलते.
नवीन संशोधनात भारतातील अनोखी परिस्थिती समोर आली आहे. कामाच्या ठिकाणी प्रेमसंबंध होण्याचे प्रमाण वाढले असून हे आता अनेकांसाठी सामान्य झाले आहे.
डेटिंग प्लॅटफॉर्म Ashley Madison च्या सर्वेक्षणानुसार कामाच्या ठिकाणी प्रेमसंबंध मान्य करणाऱ्यांमध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे.
हे संशोधन YouGov च्या मदतीने ११ देशांमध्ये केले गेले. यात ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, जर्मनी, भारत, इटली, मेक्सिको, स्पेन, स्वित्झर्लंड, यूके आणि अमेरिका यांचा समावेश होता.
या सर्वेक्षणात एकूण 13,581 लोकांनी सहभाग घेतला. त्यामुळे मिळालेले निष्कर्ष महत्त्वाचे ठरतात.
दहापैकी चार भारतीयांनी कबूल केले की त्यांनी सहकाऱ्याला डेट केले आहे किंवा सध्या डेट करत आहेत.
मेक्सिकोमध्ये 43% लोक ऑफिस संबंधात असल्याचे सांगतात, तर भारत 40% सह दुसऱ्या क्रमांकावर आहे.
पुरुष सहकाऱ्यांसोबत डेट करण्याची शक्यता महिलांपेक्षा जास्त असल्याचे सर्वेक्षणात दिसून आले.
ऑफिस नात्यामुळे करिअर किंवा वैयक्तिक आयुष्यावर परिणाम होऊ शकतो याची महिलांना अधिक जाणीव असल्याचे दिसते.