Sakshi Sunil Jadhav
कोथिंबीर वडी ही महाराष्ट्रातील आवडती रेसिपी आहे. पण घरच्या घरी करताना वडी आतून कच्ची राहते. कापताना फुटते किंवा नरम पडते हे प्रकार अनेकदा घडतात. यामुळे चव आणि टेक्स्चर दोन्ही बिघडते. पाककृतीत छोटासा बदल आणि एक खास ट्रिक वापरली तर वडी खमंग, कुरकुरीत आणि पूर्णपणे शिजलेली तयार होते.
कोथिंबिर धुतल्यानंतर तिला थोडा वेळ पसरवून ठेवा. पानांवर पाणी राहिल्यास पीठ ओलसर होते आणि वडी आतून कच्ची राहते.
फक्त बेसन वापरल्यास वडी नरम होते. त्यात 2-3 चमचे तांदळाचे पीठ मिसळल्यास वडी जास्त कुरकुरीत होते.
पीठ पातळ किंवा सैल झाल्यास वडी नीट सेट होत नाही. हाताला लागेल इतपत घट्ट पीठ करा.
थंड पातेल्यात स्टीम बनवल्यास मिश्रण समान तापत नाही आणि वडी मध्यभागी कच्ची राहते. खूप लोक 10–12 मिनिटांतच स्टीम बंद करतात. पण योग्य स्टीमिंग केल्यास वडी पूर्ण शिजते आणि कापताना तुटत नाही.
गरम असताना कापल्यास वडी फुटते. थंड झाल्यावर कापल्यास बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ टेक्स्चर मिळते.
अतिशय गरम तेलावर वडी टाकल्यास बाहेरून काळी होते आणि आत कच्ची राहू शकते. मध्यम आचेवर तळल्यास वडी छान क्रिस्पी आणि खमंग होते. तिळामुळे चव वाढते, तसेच वडी जास्त कुरकुरीत बनते.