Sakshi Sunil Jadhav
गाजरात मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन A, फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स असल्याने ते आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानलं जातं. गाजराची चटणी ही चविष्ट, झटपट आणि पौष्टिक अशी रेसिपी आहे. पोळी, पराठा किंवा जेवणात तोंडी लावण्यासाठी ही चटणी उत्तम पर्याय मानली जाते. कमी साहित्य आणि कमी वेळात तयार होणारी ही चटणी घरच्या घरी झटपट बनवता येते.
किसलेलं गाजर ½ वाटी, लाल सुकी मिरची 1 ते 2, किसलेलं सुकं खोबरं 1 टेबलस्पून, हळद ½ टीस्पून, लाल तिखट ¼ टीस्पून, लसणाच्या पाकळ्या 3 ते 4, मोहरी ½ टीस्पून, कढीपत्ता, तेल, मीठ, साखर, अर्ध्या लिंबाचा रस इ.
किसलेले गाजर आणि किसलेलं सुकं खोबरं मिक्सरच्या भांड्यात घ्या. यामुळे चटणीला मऊपणा आणि स्वाद दोन्ही मिळतात.
त्यात हळद, लाल तिखट, मीठ आणि चिमूटभर साखर घाला. हे मसाले गाजराच्या गोडव्याला परफेक्ट बॅलन्स देतात.
अर्ध्या लिंबाचा रस घातल्याने चटणीची चव ताजी, तिखट-तुरट आणि अधिक रुचकर होते.
चटणीला घट्ट टेक्स्चर येण्यासाठी पाणी अगदी कमी वापरा. मऊ पण जास्त पातळ न होणारी कन्सिस्टन्सी योग्य ठरते.
फोडणी ही चटणीचा स्वाद बदलणारी मुख्य पायरी आहे. एका छोट्या पातेल्यात तेल गरम करा.
गरम तेलात मोहरी घातल्यावर तिचा सुगंध आणि क्रंच चटणीला खास चव देते. कढीपत्ता आणि लसूण तळल्याने चटणीला प्रखर वास आणि ऑथेंटिक साऊथ इंडियन फ्लेव्हर मिळतो.
सुक्या लाल मिरच्या हलक्या तळल्याने त्यांचा रंग आणि सुगंध फोडणीत उतरतो. चटणीला आकर्षक रंग मिळतो.
ही फोडणी वाटलेल्या चटणीवर टाकून नीट मिक्स करा. यामुळे चटणीला परफेक्ट 'चटका' फ्लेव्हर मिळतो आणि चव दुपटीने वाढते.