Sakshi Sunil Jadhav
कामाच्या ठिकाणी मतभेद, तणाव किंवा छोट्या मोठ्या वादांची शक्यता कायम असते. टीमवर्क, डेडलाइन्स आणि दडपण यामुळे वातावरण तंग होते. मात्र तज्ज्ञांच्या मते, काही स्मार्ट उपाय अवलंबल्यास ऑफिसमधील वाद वाढण्याऐवजी सहज नियंत्रणात राहू शकतात.
ऑफिसमधील वाद टाळणे शक्य नाही, पण त्यांना योग्यवेळी, शांतपणे आणि व्यावसायिक पद्धतीने हाताळले तर कामाचे वातावरण सकारात्मक राहते आणि कार्यक्षमता वाढते.
वाद वाढलेल्या क्षणी प्रतिक्रिया देऊ नका. १० ते १५ सेकंद शांत राहून विषय ऐका. शांतपणे बोलल्याने समोरच्यालाही परिस्थिती संयमाने हाताळता येते.
वादाचा मूळ मुद्दा समजून घेणे महत्त्वाचे. फक्त स्वतःचा बाजू न मांडता, समोरच्या व्यक्तीचा दृष्टिकोन नेमका काय आहे ते जाणून घ्या.
'तू असं केलं' म्हणण्यापेक्षा 'मला असे वाटले' असे म्हणणे अधिक परिणामकारक. यातून दोषारोप कमी होतात.
गर्दीत किंवा सर्वांसमोर वाद चर्चू नका. शांत ठिकाणी एकांतात चर्चा केल्यास समस्या लवकर सुटते.
राग, ताण, चिडचिड संभाषणातील टोन बिघडवतात. व्यावसायिक सीमा सांभाळून बोलणे गरजेचे.
वाद जिंकण्यापेक्षा समस्या सोडवण्यावर लक्ष द्या. दोघांनाही मान्य होईल असा मध्यम मार्ग शोधा.
परिस्थिती हाताबाहेर जाण्याची चिन्हे दिसत असल्यास HR किंवा टीम लीडरकडे स्पष्टपणे मांडणी करा.