LPG Gas Cylinder: फक्त ३०० रूपयांत गॅस सिलिंडर, राज्य सरकारची मोठी घोषणा, लाखो लोकांना होणार फायदा

Assam Government Scheme: आसाम सरकारने मध्यमवर्गीयांसाठी महत्त्वाची योजना सुरु केली आहे. आता मध्यमवर्गीयांना फक्त ३०० रुपयात गॅस सिलिंडर मिळणार आहे.
LPG Gas Cylinder
LPG Gas CylinderSaam Tv
Published On
Summary

आसाम सरकारची मोठी घोषणा

महिलांना फक्त ३०० रुपयात मिळणार सिलिंडर

महागाईपासून सर्वसामान्यांना दिलासा

केंद्र सरकारने महिलांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. यामध्ये विशेषत महिलांसाठी काही योजना आहेत. महिलांना गॅस सिलिंडरसाठी सब्सिडी दिली जाते. दरम्यान, आता त्यानंतर आसाम सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सरकारने राज्यातील गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबियांना दिलासा दिला आहे. आता आसाममध्ये ३०० रुपयात एलपीजी सिलिंडर मिळणार आहे.

LPG Gas Cylinder
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना बंद झाली तर राजीनामा देईन, भाजप आमदाराचं मोठं विधान

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी सांगितले की, लवकरच ३०० रुपयांनी एलपीजी गॅस सिलिंडर उपलब्ध केला जाईल. महागाईपासून गरीब कुटुंबातील नागरिकांना दिलासा मिळावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

किती सब्सिडी मिळणार?

सरकारने सांगितले की, ओरुनोदोई स्कीम आणि पीएम उज्जवला योजनेअंतर्गत २५० रुपयांची सब्सिडी दिली जाणार आहे. यामुळे आता नागरिकांना केवळ ३०० रुपयांत सिलिंडर मिळणार आहे.

कोणाला मिळणार लाभ?

ओरुनोदोई योजनेअंतर्गत पीएम उज्जवला योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात थेट सब्सिडी दिली जाणार आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सब्सिडीचे पैसे लाभार्थ्यांच्या अकाउंटमध्ये जमा केले जाणार आहेत. जेणेकरुन त्यांना गॅस बुकिंग करताना पैसे देता येतील.

LPG Gas Cylinder
Government Scheme: 'या' राज्यातील लाडकींसाठी आनंदाची बातमी, आज खात्यात जमा होणार १०,००० रुपये

महिलांना होणार फायदा

सरकारच्या म्हणण्यांनुसार, आर्थिकदृष्ट्या कमजोर कुटुंबातील महिलांना सर्वात जास्त दिलासा मिळणार आहे. या महिलांना दर महिन्याला आर्थिक मदत दिली जाते. एलपीजी सब्सिडी मिळाल्यानंतर घरगुती खर्च कमी होईल. त्यामुळे मध्यमवर्गीयांना फायदा होणार आहे.

एलपीजी गॅसच्या किंमती मागच्या अनेक दिवसांपासून वाढत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना घरखर्च कसा भागवायचा असा प्रश्न पडत होता. परंतु आता या सब्सिडीमुळे खर्चाचा ताण कमी होणार आहे. लवकरच यासंबंधित संबंधित विभाग आणि डिस्ट्रीब्युटर्संना निर्देश जारी केले जातील.

LPG Gas Cylinder
Government Scheme: १० लाख महिलांच्या खात्यात आज खटाखट जमा होणार ₹१०,०००; मुख्यमंत्री करणार ट्रान्सफर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com