Cigarette Price Hike Saam Tv
बिझनेस

Cigarette Price Hike: सिगारेट, तंबाखू आणि पान मसाल्याच्या किंमतीत वाढ! एका सिगारेटसाठी किती पैसे मोजावे लागणार?

Tobacco Cigarette Price Hike From Today: आजपासून सिगारेटच्या दरात वाढ झाली आहे. सिगारेटच्या दरावर उत्पादन शुल्क वाढवण्यात आले आहेत. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलाच फटका बसणार आहे.

Siddhi Hande

सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची बातमी

सिगारेटच्या किंमती वाढल्या

१८ रुपयांची सिगारेट आता ७० ते ७२ रुपयांनी मिळणार

Union Budget 2026: जर तुम्हीही सिगारेट किंवा पान मसाला असे तंबाखूजन्य पदार्थ खात असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी. आजपासून तुमच्या खिशाला चांगलाच फटका बसणार आहे. तंबाखूजन्य पदार्थांच्या किंमतीत वाढ झाली आहे. यावर सरकारने कर वाढवला आहे. त्यामुळे तुमच्या खिशाला फटका बसणार आहे.

वित्त मंत्रालयाने केंद्रीय उत्पादन शुल्क कायद्यात बदल केले आहेत. हा बदल आजपासून म्हणजे १ फेब्रुवारीपासून लागू झाला आहे. या नवीन नियमांनुसार सिगारेटवरील उत्पादन शुल्क अनेक वेळा वाढवण्यात आले आहे.

प्रति १००० सिगारेट उत्पादन शुल्क दर आता २,०५० ते ८,५०० पर्यंत जाणार आहे. काही सिगारेटवर कर ११,००० रुपयांपर्यंत पोहचू शकतो. हा दर सिगारेटची लांबी आणि श्रेणींवर अवलंबून आहे. याचसोबत सिगारेटवर आदीच लादलेला ४० टक्के जीएसटी तसाच राहिल. त्यामुळे एकूण दर ६० ते ७० टक्क्यांपर्यंत पोहचू शकतो.

सिगारेटचे दर किती रुपयांनी वाढणार? (New Cigarette Price )

नवीन कर प्रणालीचा दर थेट सिगारेटच्या किरकोळ किंमतीवर होणार आहे. तज्ज्ञांच्या मते, १८ रुपयांच्या किंमतीच्या सिगारेटचे दर ७० ते ७२ रुपयांपर्यंत पोहचू शकता. त्यामुळे धूम्रपान करणाऱ्यांना चांगलाच फटका बसणार आहे.

तंबाखूजन्य पदार्थ महागणार

नवीन उत्पादन शुल्काचा परिणाम फक्त सिगारेटवर नाही तर तंबाखूजन्य पदार्थांवरही होणार आहे. कच्च्या तंबाखूवर ६० ते ७० टक्के कर आकारला जाईल. निकोटीन संबंधित उत्पादनांवर १०० टक्के कर लागू होतो. तसेच पान मसाला, गुटखा या पदार्थांवर आरोग्य आणि राष्ट्रीय सुरक्षा उपकर लादला जातो. यामुळे सर्वच तंबाखूजन्य पदार्थांच्या किंमती वाढल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shivsena: शिवसेना पक्ष अन् चिन्ह कुणाचे? सुप्रीम कोर्टात आज महत्वाची सुनावणी

Maharashtra News Live Update: कोयना धरण परिसराला भूकंपाचा धक्का

SIM Card: सिम कार्ड दुसऱ्याला देणं पडेल महागात, ५० लाखांचा दंड अन् ३ वर्षांचा तुरुंगवास

Stomach cancer: पोटात कॅन्सरची गाठ वाढत असताना दिसणारं पहिलं लक्षण कोणतं? या 6 लक्षणांकडे दुर्लक्ष नको

Mumbai : मुंबईत धक्कादायक घटना! CSMT रेल्वे पोलिसांच्या कोठडीत तरुणाचा मृत्यू; बाथरूममध्ये गेला अन्...

SCROLL FOR NEXT