PAN Card Saam Tv
बिझनेस

PAN Card : सरकारचा मोठा निर्णय! पॅन कार्डमध्ये होणार बदल; आता QR कोडवर मिळणार सर्व माहिती

PAN Card 2.0 Project: केंद्र सरकारने पॅन कार्डबाबत एक निर्णय घेतला आहे. पॅन कार्डवर आता क्यूआर कोड देण्यात आहे. त्यामुळे सर्व माहिती एका क्लिकवर तुम्हाला मिळणार आहे.

Siddhi Hande

सर्वसामान्य नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकारने पॅन कार्डबाबत नवीन निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने सोमवारी PAN 2.O प्रोजेक्टसाठी मंजुरी दिली आहे. या प्रोजेक्टसाठी केंद्र सरकारने १४३५ रुपयांची गुंतवणूक केली आहे. यामुळे आता सर्व नागरिकांना अपडेटेड पॅन कार्ड मिळणार आहे. (Pan Card 2.0)

या नवीन पॅन कार्डमध्ये क्यूआर कोड देण्यात येणार आहे.यासाठी तुम्हाला कोणतेही पैसे द्यावे लागणार आहे. या नवीन प्रोजेक्टद्वारे पॅन कार्डमध्ये परिवर्तन मिळणार आहे. यामुळे करदात्यांना अनेक सेवा सोप्या पद्धतीने मिळणार आहे. यामुळे त्वरित डिलिव्हरी, गुणवत्तेत सुधारणा, डेटामध्ये नियंत्रण, पर्यावरणसाठी अनुकूल आणि उत्तम इन्फ्रास्टक्चर मिळणार आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली CCEA आयकर विभागाअंतर्गत या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. या प्रकल्पाविषयी स्पष्टीकरण देताना अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, तंत्रज्ञानावर आधारित करदात्यांची नोंदणी सेवा, सुलभता किंवा जलद सेवा वितरण या गोष्टींवर लक्ष केंद्रित केले आहे. सध्या ७८ कोटी पॅन कार्ड जारी करण्यात आसे आहेत. त्यापैकी ९८ टक्के पॅन कार्ड हे वैयक्तिक स्तरावर जारी करण्यात आले आहे. (Pan Card News)

जुन्या पॅन कार्डचं काय?

आता नवीन पॅन कार्डसाठी अर्ज करण्याची गरज आहे का? किंवा सध्याच्या पॅन कार्डचं काय होणार, असे अनेक प्रश्न अनेकांना पडले असतील. तर तुमचा सध्याचा पॅन नंबर बदलण्याची गरज नाही, असं अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. तसेच तुम्हाला अपग्रेडेड प्रक्रियेतून जावे लागेल. त्यानंतर तुम्हाला नवीन पॅन कार्ड मिळू शकेल.

अपडेटेड पॅन कार्ड नवीन वैशिष्ट्यांसह येणार आहे. यामध्ये QR कोड समाविष्ट आहे. अपग्रेडेट पॅन कार्ड विनामूल्य असणार आहे. ते नवीन कार्ड तुम्हाला थेट देण्यात येणार आहे. सध्याच्या डिजिटल पद्धतीने पॅन कार्ड अपग्रेड करणे खूप सोपे होणार आहे. अपडेटची प्रक्रिया पेपरलेस आणि ऑनलाइन असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT