Aadhaar Pan Link: तुमचे पॅन कार्ड होऊ शकतं बंद; आताच करा 'हे' काम

Aadhaar -PAN Link News: आधार कार्ड हे प्रत्येक भारतीयांसाठी महत्त्वाचे कागदपत्र आहे. आधार कार्ड आणि पॅन कार्डचा वापर करुन अनेक महत्त्वाची कामे होतात.
Aaadhar Pan Link
Aadhaar -PAN Link NewsSaam Tv
Published On

आधार कार्ड हे प्रत्येक भारतीयांसाठी महत्त्वाचे कागदपत्र आहे. आधार कार्ड आणि पॅन कार्डचा वापर करुन अनेक महत्त्वाची कामे होतात. जर आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक नसेल तर अनेक अडचणी येतात. आता आधार कार्ड आणि पॅन कार्ड करण्यासाठी डेडलाइन देण्यात आली आहे.

आधार कार्ड आणि पॅन कार्ड जर लिंक नसेल तर तुम्हाला सरकारी कामांमध्ये अडचण येत नाही. बँकेचे खाते उघडल्यापासून ते घर घेण्यापर्यंत सर्व कामांसाठी आधार कार्ड आणि पॅन कार्ड गरजेचे असते. आता आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२४ आहे. जर तुम्ही याआधी आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक नाही केले तर ते डी-अ‍ॅक्टिव्हेट केले जाईल. त्यामुळे तुम्हाला बँकेच्या कामात अडथळे येऊ शकतात.

Aaadhar Pan Link
Healthy Poha Recipe: वजन कमी करायचं पण चवीत बदल नकोय? अगदी १० मिनिटांत बनवा हेल्दी-टेस्टी पोहे

आधार कार्ड लिंक करणे का गरजेचे आहे?

सध्या अनेक सायबर क्राईमच्या घटना सतत कानावर येत असतात. त्यात फेक अकाउंट, आयडी, प्रोफाइल तयार करून लोक वावरतात त्याचा थेट परिणाम तुमच्या महत्वाच्या कामांवर होतो. त्यात फेक पॅन कार्डचा तसेच आधारकार्डचा वापर केला जातो. त्यामुळे जर तुमचे आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक करणे गरजेचे आहे.

जेणेकरुन तुमच्या माहितीचा गैरवापर रोखता येऊ शकतो. जर तुम्ही मुदतीपूर्वी दोन्ही लिंक केले नाहीत तर तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय होईल. यामुळे आर्थिक व्यवहार करण्यात अडचणी यांसह विविध समस्या उद्भवू शकतात. म्हणून, तुम्ही तुमच्या पॅन-आधार लिंकची स्थिती तपासली पाहिजे. तुमचा पॅन आधारशी लिंक नसेल तर लगेच लिंक करा.

लिंक करण्यासाठी शुल्क किती?

सरकारने 30 जून 2023 पर्यंत पॅन कार्डला आधारशी लिंक करणे मोफत ठेवले होते. मात्र, आता यासाठी शुल्क भरावे लागणार आहे. आधी 500 रुपये होते आता 1000 रुपये झाले आहेत. याचा अर्थ असा की जर तुम्हाला पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करायचे असेल तर तुम्हाला विलंब शुल्क किंवा दंड म्हणून 1,000 रुपये भरावे लागतील. आयकर विभाग देखील करदात्यांना पॅन आणि आधार लिंक करण्यासाठी पूर्ण मदत करत आहे. पॅनला आधारशी लिंक करण्याच्या प्रक्रियेशी संबंधित प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी FAQ पेज देखील तयार केले आहे. हे तुम्हाला संपूर्ण प्रक्रिया समजून घेण्यास मदत करते.

Written By: Sakshi Jadhav

Aaadhar Pan Link
Cold & Cough : सर्दी-खोकल्यावर रामबाण उपाय तुमच्या किचनमध्येच आहे, डॉक्टरच्या औषधांशिवाय व्हाल बरे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com