भारतात आपल्याला नाश्ता म्हंटल की, पोहे, उपमा, शीरा आठवतो. हे पदार्थ चवीला उत्तम असले तरी त्याने तुमचा फॅट वाढू शकतो. मग नाश्ता करणे सोडलं पाहिजे का? तर असे अजीबात नाही तुम्ही यातीलच एका पदार्थापासून उत्तम हेल्दी नाश्ता तयार करु शकता. त्यामुळे तुमचे वजन नियंत्रणात येईल आणि ही रेसिपी सुद्धा एका झटक्यात तयार होईल. चला तर जाणून घेऊ हेल्दी पोह्यांची रेसिपी.
हेल्दी पोहे तयार करण्याचे साहित्य:
1 कप पोहे
1/2 कप मोहरी (कोन्टेनरमध्ये येणारी)
1/4 कप किसलेले गाजर
1/4 कप किसलेला टोमॅटो
1/4 कप किसलेला कांदा
1/4 कप हरभरे
1/2 चमचा जीरे
सर्वप्रथम पोहे एका बाऊलमध्ये घेऊन चाळणीत पाण्याने हलकेच धुवा. त्यानंतर त्यातील पाणी काढून ठेवा आणि पोह्यांमध्ये थोडे मीठ मिसळा. पोहे थोडा वेळ मुरण्यासाठी ठेवा. आता एका कढईत तेल तापवा आणि त्यात मोहरी , राई, हळद, धणे आणि हिंग घालून फोडणी द्या. मग त्यात कांदा, गाजर, टोमॅटो आणि हरभरा टाकून शिजवा. त्यावर दोन ते तीन मिनिटे झाकन ठेवून वाफेवर भाज्या शिजवा. मग त्यात पोहे मिक्स करा आणि मीठ, लिंबाचा रस मिक्स करुन छान परतून घ्या. आता गरम गरम हेल्दी पोहे सर्व्ह करा.
वजन कमी करण्यासाठी टिप्स:
1. पोहे तयार करण्यापुर्वी जास्त वेळ भिजवा.
2. मोहरीचा वापर कमी करावा.
3. तेलाचा वापर मर्यादित करावा.
4. जास्त प्रमाणात भाज्या वापराव्यात.
Written By: Sakshi Jadhav