Thyroid Disease: थायरॉईड होण्याची कारणं काय? उपाय कोणता? जाणून घ्या सविस्तर

thyroid causes: थायरॉईडची समस्या सामान्य नाही त्यावर वेळीच उपाय करणे महत्वाचे आहे.
thyroid  causes and solution
Thyroid Disorder, Thyroid Saam Tv
Published On

थायरॉईडची समस्या ही थायरॉईड ग्रंथीच्या योग्य प्रकारे कार्य न केल्यामुळे उद्भवते. थायरॉईड ग्रंथी, जी आपल्या मानेच्या पुढील बाजूस असते, शरीरातील चयापचय नियंत्रित करणारे हार्मोन्स तयार करते. थायरॉईड हे मुख्यतः दोन प्रकारचे असतात या सगळ्याची माहिती आपण जाणून घेणार आहोत.

थायरॉईडचे दोन प्रकार

हायपोथायरॉईडीझम (Hypothyroidism): यामध्ये थायरॉईड ग्रंथी पुरेसे हार्मोन्स तयार करत नाही. यामुळे थकवा, वजन वाढणे, थंडी वाजणे, केस गळणे यांसारख्या समस्या होतात.

हायपरथायरॉईडीझम (Hyperthyroidism): यामध्ये थायरॉईड ग्रंथी अधिक प्रमाणात हार्मोन्स तयार करते. यामुळे वजन कमी होणे, हृदयाचे ठोके वाढणे, चिडचिड होणे यांसारख्या समस्या होतात.

thyroid  causes and solution
Wedding Dates: यंदाच्या वर्षी उडवा बार! तुळशी विवाहानंतर कधी आहेत शुभ मुहूर्त, जाणून घ्या

थायरॉईड समस्येची मुख्य कारणे पुढील प्रमाणे आहेत:

ऑटोइम्यून समस्या

शरीरातील प्रतिकारशक्तीचा थेट परिणाम थायरॉईड ग्रंथीवर होतो.

आहारातील आयोडिनची कमतरता

आयोडिन थायरॉईड हार्मोन्स तयार करण्यासाठी आवश्यक आहे. त्याप्रकारचे पदार्थ खाणे शरीरासाठी खूप महत्वाचे आहे.

वांशिकतेचा परिणाम होतो का?

कुटुंबातील एखाद्या सदस्याला थायरॉईड समस्या असल्यास, ही समस्या आनुवंशिकतेमुळे येऊ शकते.

स्ट्रेस व ताणतणाव

अधिक तणावामुळे शरीरावर परिणाम होतो व थायरॉईडवरही त्याचा प्रभाव पडतो.

औषधांचा परिणाम

काही औषधे थायरॉईड ग्रंथीच्या कार्यात अडथळा आणू शकतात.

थायरॉईडसाठी उपचार व उपाय

औषधे

हायपोथायरॉईडीझमसाठी, थायरॉईड हार्मोन रिप्लेसमेंट ट्रीटमेंट (जसे की लेव्होथायरॉक्सिन) दिले जाते. हायपरथायरॉईडीझममध्ये थायरॉईड हार्मोनच्या निर्मितीला कमी करणारी औषधे दिली जातात.

योगासने

थायरॉईड संतुलित करण्यासाठी, काही योगासने (सरलासन, मत्स्यासन, सर्वांगासन, हलासन) आणि ध्यान फायदेशीर ठरतात.

आहारातील बदल

थायरॉईडसाठी योग्य आहाराचा अवलंब करावा, जसे की आयोडिनयुक्त मीठ, भरपूर पाणी, ताज्या फळे-भाज्या, भरडधान्ये आणि प्रथिनेयुक्त पदार्थ. यात प्रोसेस्ड फूड, अधिक मीठ,चिकण पदार्थ आणि शर्करा असलेले पदार्थ खाणे टाळा.

तणाव व्यवस्थापन

तणाव कमी करण्यासाठी नियमित व्यायाम, ध्यान, आणि योग यांचा अवलंब करा.

नियमित तपासणी

थायरॉईडची समस्या नियंत्रणात ठेवण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नियमित तपासणी आणि योग्य औषधोपचार गरजेचे आहेत. मात्र थायरॉईड समस्या असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्वाचे आहे.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Written By: Sakshi Jadhav

thyroid  causes and solution
Cold & Cough : सर्दी-खोकल्यावर रामबाण उपाय तुमच्या किचनमध्येच आहे, डॉक्टरच्या औषधांशिवाय व्हाल बरे

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com