Central Bank of India Saam Tv
बिझनेस

Central Bank Jobs: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार सेंट्रल बँकेत नोकरी; या पदांसाठी भरती सुरु; अर्ज कुठे अन् कसा करावा?

Central Bank of India Recruitment: सेंट्रल बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. सेंट्रल बँकेत सध्या फॅकल्टी पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

सेंट्रल बँकेत नोकरीची संधी

सेंट्रल बँकेअंतर्गत फॅकल्टी पदासाठी भरती सुरु

अर्ज करण्याची शेवटची तारीख

बँकेत चांगल्या पदावर नोकरी करण्याचे अनेकांचे स्वप्न असते. आता बँकेत नोकरी करण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण होणार आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियाने भरती जाहीर केली आहे. फॅकल्टी पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी www.centralbankofindia.co.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचे आहेत. नोकरी करण्याची उत्तम संधी तुमच्याजवळ आहे.

सेंट्रल बँक ऑफ इंडियाने रीजनल ऑफिस होशांगाबाद आणि बैतूल येथे भरती जाहीर केली आहे. सेंट्रल बँकेने सामाजिक उत्थान अवम प्रशिक्षण संस्था यासाठी भरती जाहीर केली आहे. ही बँकेची नोंदणीकृत ट्रस्ट आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी अर्ज करायचे आहेत.

कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार नोकरी (Central Bank Jobs Without Exam)

सेंट्रल बँक ऑफ इंडियामधील या नोकरीसाठी तुम्हाला कोणतीही परीक्षा देण्याची गरज नाही. तुमची निवड शॉर्टलिस्टिंग आणि मुलाखतीद्वारे होणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १० डिसेंबर २०२५ आहे. अर्ज करण्यासाठी शेवटच्या तारखेची वाट वाहू नका. त्याआधीच अर्ज करावेत.

सेंट्रल बँकेतील या नोकरीसाठी २२ ते ४० वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतत. या नोकरीसाठी अर्ज करताना कोणतेही शुल्क भरायचे नाहीत.

पात्रता (Eligibility)

प्रादेशिक कार्यालयात प्राध्यापक पदासाठी पदवीधर असणे गरजेचे आहे. विज्ञान, वाणिज्य कला यापैकी कोणत्याही शाखेत पदवी प्राप्त केलेले असावी. दरम्यान, MSW/MS रूरल डेवलपमेंट/ सोशियोलॉजी/ साइकोलॉजी/बीएससी वेटरनरी/हॉर्टिकल्चर/बीएससी अॅग्रो मार्केटिंग करणाऱ्यांना प्राधान्य दिले जाईल. अर्ज करणाऱ्या उमेदवाराला कॉम्प्युटर नॉलेज असायला हवे. याचसोबत स्थानिक भाषा यायला हवी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन, भाजपविरोधात आक्रमक

Mumbai : मुंबईतील स्टेशनवर बेवारस बॅगेत सापडलं लाखोंचं घबाड, पैसे नेमके कुणाचे? पोलिसांना समजताच...

Maharashtra Nagar Parishad Live : बीडमध्ये निवडणुकीला हिंसक वळण, दोन गटात राडा अन् दगडफेक

kitchen Hacks: बटाट्यांना कोंब फुटलेत? नरम पडतात? १ सिंपल ट्रिक, महिनाभर राहतील चांगले

धनंजय मुंडेंचा इंदूरमध्ये हत्येचा कट? पंकजा मुंडेकडून खुलासा, राजकरणात खळबळ|VIDEO

SCROLL FOR NEXT