Navi Mumbai : नवी मुंबई हादरली! कॉम्प्युटर क्लास मालकाकडून शिक्षिकेचा विनयभंग

Airoli Crime News : नवी मुंबईतील ऐरोलीमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. कॉम्प्युटर क्लासमध्ये एका शिक्षिकेवर त्याच क्लासच्या मालकाने विनयभंग केला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
Navi Mumbai Crime News
Navi Mumbai Crime Newsx
Published On

विकास मिरगणे, साम टीव्ही, प्रतिनिधी

नवी मुंबईमधील ऐरोलीमधून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ऐरोली सेक्टर ३ येथे एका खासगी कॉम्प्युटर क्लासेस चालवणाऱ्याने क्लासमधील शिक्षिकेचा विनयभंग केल्याची माहिती उघडकीस आली आहे. या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकारामुळे ऐरोली परिसरामध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांना कॉम्प्युटरचे मूलभूत शिक्षण देण्यासाठी आलेल्या शिक्षिकेवर कॉम्प्युटर क्लासेसचा मालक संदीप याने विनयभंग केला आहे. पीडित शिक्षिकेने याबाबत रबाळे पोलीस ठाण्यात तक्रार देखील केली. पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला आणि आरोपीला बेड्या ठोकल्या.

Navi Mumbai Crime News
Mira Bhayandar Protest : मीरा-भाईंदरमध्ये आंदोलन चिघळलं; मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर बाटली भिरकावली

कॉम्प्युटर क्लासमध्ये शिक्षिकेचा विनयभंग होत असेल, तर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचे काय? असा प्रश्न पालकांमध्ये उपस्थित होत आहे. या प्रकरणातील आरोपी संदीपला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीने क्लासमधील इतर कोणत्या महिलेसोबत काही गैरकृत्य केले आहे का याचा शोध सध्या रबाळे पोलीस घेत आहेत.

Navi Mumbai Crime News
Pratap Sarnaik : वातावरण तापले! प्रताप सरनाईकांना पाहून मोर्चामध्ये ५० खोक्याच्या घोषणा, आल्या पावली माघारी परतले

ऐरोली सेक्टर ३ येथील एसआयटी या खासगी कॉम्प्युटर क्लासेसमध्ये एका महिला शिक्षिकेवर विनयभंग झाल्याची माहिती समोर आली आहे. धक्कादायक बाब अशी की, क्लासेसचा मालक संदीप यानेच शिक्षिकेवर अत्याचार केले आहेत. शिक्षिकेने पोलीस ठाण्यात तक्रार केली असून पोलिसांनी क्लासमालकाविरोधात कारवाई केली आहे.

Navi Mumbai Crime News
Marathi Morcha : मनसे नेते अविनाश जाधवांना पोलिसांनी सोडलं, पहाटेच घरातून घेतलं होतं ताब्यात

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com