अनेकांचा स्वतः चा व्यवसाय सुरु करण्याचे स्वप्न असते. तुम्हालाही जर स्वतः चा व्यवसाय सुरु करायचा असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी. तुम्ही घराच्या छतावर स्वतः चा बिझनेस सुरु करु शकतात. कमीत कमीत भांडवलात तुम्ही यशस्वी उद्योजक बनू शकतात.
घराच्या छतावर बिझनेस सुरु केल्यावर तुम्हाला जागेचे भाडेदेखील द्यावे लागणार नाही. त्यामुळे तो खर्चदेखील वाढेल. त्याचसोबत सोलर पॅनल यांसारख्या व्यवसायात तुमच्या घरातील विजेचीदेखील बचत होऊ शकते. तुम्ही घराच्या छतावर शेती, सोलर पॅनल, होर्डिंग्स यांसारखे व्यवसाय सुरु करु शकतात.
टेरेस फार्मिंग (Terrace Farming)
टेरेस फार्मिंग हे सध्या खूप प्रसिद्ध आहे.टेरेस फार्मिंग म्हणजे तुम्ही घराच्या छतावर शेती करु शकतात. घराच्या छतावर तुम्ही कमीत कमी खर्चात काही फळांचे झाडे, वनस्पती उगवू शकतात.त्याचसोबत तुम्ही भाज्यांचे पिकदेखील घेऊ शकतात. पॉलिबॅगमध्ये भाज्याचे बियाणे लावू शकतात.
सोलन पॅनेल (Solar Panel)
तुम्ही सोलर पॅनेल लावून स्वतः चा व्यवसाय सुरु करु शकतात. सोलर पॅनलमुळे तुम्हाला विजेचे बीजदेखील जास्त येणार आहे. तसेच घरातील वीजबीलदेखील कमी येईल.
मोबाईल टॉवर (Mobile Tower)
जर तुम्ही तुमच्या घराच्या छताला भाड्याने दिले तर तुमची चांगली कमाई होऊ शकते. मोबाईल कंपनीचे टॉवर लावण्यासाठी तुम्हाला पैसे देईल. तुम्हाला जर मोबाईल टॉवर लावायचे असेल तर टॉवर ऑपरेटर कंपनीशी संपर्क साधावा.
होर्डिंग्स किंवा बॅनर (Hoardings And Banner)
तुमचे घर जर रस्त्याच्या बाजूला असेल तर तुम्ही छतावर होर्डिंग्स किंवा बॅनर लावू शकतात. यामुळे तुमची चांगली कमाई होईल. फक्त हे होर्डिंग्स लावताना कायदेशीर गोष्टींचे पालन करावे. होर्डिंगची साइज चेक करावी.त्यातून तुम्हाला भाडे मिळेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.