Budget 2026 Saam Tv
बिझनेस

Budget 2026: अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना गुडन्यूज मिळणार! पीएम किसान योजनेचा हप्ता ₹२०००नी वाढण्याची शक्यता

Budget 2026 PM Kisan Yojana Installment will Increase: अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे. पीएम किसान योजनेचा हप्ता २००० रुपयांनी वाढवला जाण्याची शक्यता आहे.

Siddhi Hande

अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना गिफ्ट मिळणार?

पीएम किसानचा हप्ता वाढण्याची शक्यता

पीएम किसानचा हप्ता ६००० रुपयांवरुन ८००० होणार

आज देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारामन या अर्थसंकल्प सादर करणार आहे. निर्मला सितारामन अर्थसंकल्पात मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. सर्वसामान्यांना अर्थसंकल्पाकडून खूप अपेक्षा आहेत. दरम्यान, आज सरकारच्या विविध योजनांबाबत महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे. या अर्थसंकल्पाकडून शेतकऱ्यांनाही खूप अपेक्षा आहेत. दरम्यान, अर्थसंकल्पात पीएम किसान योजनेचा हप्ता वाढवण्याची घोषणा होऊ शकते.

पीएम किसानचा हप्ता वाढणार (PM Kisan Yojana Installment May Increase in Budget 2026)

केंद्र सरकारची पीएम किसान योजना ही खूप लोकप्रिय योजना आहे. या योजनेत शेतकऱ्यांना सध्या वर्षाला ६००० रुपये दिले जातात. वर्षातून तीनदा हप्ता दिला जातो. दरम्यान, आता या हप्त्याची रक्कम वाढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पीएम किसानचा हप्ता २००० रुपयांनी वाढवला जाऊ शकतो.

पीएम किसान योजनेत ८००० रुपये मिळणार? (PM Kisan Yojana Installment Increase From 6000 To 8000 Rupees)

गेल्या अनेक दिवसांपासून पीएम किसान योजनेचा हप्ता वाढवण्याची मागणी होत होती. शेतकऱ्यांच्या संघटनांनी ही मागणी केली होती. गेल्या अनेक दिवसांपासून शेतीसंबंधित गोष्टी महाग होत आहेत. खते, बियाण्यांच्या किंमती वाढत आहेत. याचसोबत डीझेल, वीजेच्याही किंमती वाढत आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेचे पैसे वाढवण्याची मागणी केली होती. शेतकऱ्यांसाठी ६००० रुपये खूप कमी असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे हप्ता २००० रुपयांनी वाढवण्याची मागणी होत आहे.

पीएम किसान योजनेचा हप्ता वाढवण्याची घोषणा केली तर शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो. यामुळे शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळेल. याचसोबत कर्जातूनदेखील दिलासा मिळू शकते. दरम्यान, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले तर ग्रामीण भागात सुधारणा होती. शेतकऱ्यांच्या हातात पैसे येतील आणि याचसोबत खर्चदेखील जास्त प्रमाणात करता येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar Plane Crash: अजित पवार विमान अपघात प्रकरणी सर्वात मोठी कारवाई,DGCA ची व्हीएसआरच्या विमान उड्डाणावर बंदी

Wednesday Horoscope : मनासारखा दिवस जाईल, डोके शांत ठेवून काम कराल; ५ राशींच्या लोकांचं नशीब पालटणार

Digital Arrest: फोन आला, कोणी व्हिडिओ कॉल केला तर काय कराल? मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला बचावाचा मार्ग

T20 World Cup : झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्याआधी मोठी अपडेट, मॅच विनर फलंदाजानं अचानक टीम इंडियाची साथ सोडली, कारण चिंताजनक

Maharashtra Live News Update: विक्रोळीतील महालक्ष्मी डेरीतील ‘माझा’ शीतपेयात आढळला कचरा

SCROLL FOR NEXT