PM Kisan Samman Nidhi Yojana
PM Kisan Samman Nidhi Yojanasaam tv

PM Kisan Yojana: आजच हे काम करा, अन्यथा मिळणार नाही पीएम किसानचे ₹२०००; वाचा नवी अपडेट

PM Kisan Yojana Farmer ID Mandatory: पीएम किसान योजनेत शेतकऱ्यांना दर वर्षी ६००० रुपये मिळतात. दरम्यान, पीएम किसानचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे फार्मर आयडी असणे अनिवार्य आहे.
Published on
Summary

पीएम किसान योजनेबाबत मोठी अपडेट

शेतकऱ्यांनी हे काम करायचे आहे

फार्मर आयडीशिवाय मिळणार नाही पैसे

पीएम किसान योजनेचा कोट्यवधी शेतकरी लाभ घेतात. पीएम किसान योजनेत शेतकऱ्यांच्या खात्यात आतापर्यंत २१ हप्ते जमा झाले आहेत. त्यानंतर शेतकरी २२ व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. पीएम किसान योजनेच्या नियमात बदल करण्यात आले आहेत.आता शेतकऱ्यांना जर पीएम किसान योजनेचा लाभ मिळवायचा असेल तर त्यांच्याकडे फार्मर आयडी असणे आवश्यक आहे. जर फार्मर आयडी नसेल तर यापुढे योजनेचे पैसे मिळणार आहे.

PM Kisan Samman Nidhi Yojana
PM Kisan Yojana: शेतकऱ्यांनो, हे काम आताच करा, अन्यथा मिळणार नाही ₹२००० ; पीएम किसान योजनेबाबत अपडेट

सरकारने शेतकऱ्यांना याबाबत आधीच माहिती दिली आहे. कृषी विभागान शेतकऱ्यांसाठी डिजिट ओळखपत्र तयार केले आहे. यामुळे पीएम किसान योजनेसह इतर योजनांचा लाभ घेण्याची प्रक्रिया पारदर्शक होणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना फार्मर रजिस्ट्रेशन पूर्ण करावे लागणार आहे. यानंतरच शेतकऱ्यांना पुढचा हप्ता मिळणार आहे.

केवायसी अनिवार्य

पीएम किसानचा लाभ घेण्यासाठी सर्व लाभार्थ्यांना केवायसी करावे लागणार आहे. जर केवायसी केले नाही तर योजनेचा लाभ मिळणार नाही. आतापर्यंत अनेक शेतकऱ्यांनी केवायसी केले नाही त्यांना त्या त्या महिन्याचा लाभ मिळाला नाही.

फार्मर आयडीचा फायदा (Farmer ID Benefits)

पीएम किसान सन्मान निधी योजनेचा सज लाभ

कृषी विभागाच्या योजना, सब्सिडी किंवा इतर लाभांचा फायदा घेता येणार

शेतकऱ्यांची डिजिटल ओळखपत्र

भविष्यात अनेक कृषी योजनांचा एकत्रित लाभ मिळण्यासाठी मदत

PM Kisan Samman Nidhi Yojana
PM Kisan Yojana: शेतकऱ्यांनी कर्ज फेडलं नाही, तर बंद होणार पीएम किसानचे ₹६०००?वाचा नियम काय सांगतो

दरम्यान, सध्या उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश अशा काही राज्यांमध्ये फार्मर आयडी अनिवार्य केले आहे. भविष्यात सर्व राज्यांमध्ये फार्मर आयडी अनिवार्य केले जाईल. त्यामुळे जर तुम्ही अजूनही फार्मर आयडी काढले नसेल तर लवकरात लवकर काढा.

PM Kisan Samman Nidhi Yojana
PM Kisan Yojana: एका कुटुंबातील किती जण घेऊ शकतात पीएम किसानचा लाभ? कोणाला मिळणार ₹६०००? वाचा नियम

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com