Budget Saam Tv
बिझनेस

Budget: ८.५ कोटी नागरिकांना खुशखबर! अटल पेन्शन योजनेची रक्कम वाढवणार? अर्थसंकल्पात निर्णय होण्याची शक्यता

Budget 2026 Expectation Atal Pension Yojana : अर्थसंकल्पामध्ये सर्वसामान्य नागरिकांसाठी अनेक दिलासादायक निर्णय होऊ शकतात. अटल पेन्शन योजनेतही पेन्शनची रक्कम वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Siddhi Hande

अर्थसंकल्पाकडून सर्वसामान्यांना अपेक्षा

अटल पेन्शन योजनेत रक्कम वाढवणार

८.५ कोटी नागरिकांना होणार फायदा

आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी अर्थसंकल्प साद केला जाणार आहे. १ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. या अर्थसंकल्पात सर्वसामान्यांसाठी अनेक निर्णय होण्याची शक्यता आहे. करदात्यांनाही दिलासा मिळू शकतो. याचसोबत अनेक सरकारी योजनेबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, अर्थसंकल्पात अटल पेन्शन योजनेत पेन्शनची रक्कम वाढवण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.

अर्थसंकल्पात मोठी घोषणा होण्याची शक्यता

अटल पेन्शन योजनेच्या लाभार्थ्यांच्या मते, महागाई लक्षात घेता अटल पेन्शन योजनेची रक्कम वाढवण्याची गरज आहे. परंतु सरकारने अटल पेन्शन योजनेत रक्कम वाढवण्याचा विचार नसल्याचे अनेकदा सांगितले आहे. दरम्यान, आता या अर्थसंकल्पात याबाबत कोणता निर्णय होईल का याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

अटल पेन्शन योजनेत पेन्शनची रक्कम वाढणार? (Atal Pension Yojana Amout May Increased)

सरकारने अटल पेन्शन योजनेचा कालावधी २०३०-३२ पर्यंत वाढवला आहे. अटल पेन्शन योजना २०१५ मध्ये सुरु करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना १००० ते ५००० रुपयांपर्यंतची मासिक पेन्शन मिळते. या योजनेत तुम्ही महिन्याला फक्त ४२ रुपयांपासून ते १४५४ रुपयांपर्यंत गुंतवणूक करु शकतात.

सरकारने याबाबत याआधीही सांगितले आहे की, सध्या तरी अटल पेन्शन योजनेत रक्कम वाढवण्याचा विचार नाहीये.सरकारच्या मते, गुंतवणूकीची रक्कम वाढवली जाऊ शकते. परंतु असं केल्यास लाभार्थ्यांवर आर्थिक ताण येईल.सध्या यामध्ये कोणताही बदल करण्याचा विचार नाहीये.

८.५ कोटी लाभार्थ्यांना होणार फायदा

अटल पेन्शन योजनेत जवळपास ८,४५,१७,४१९ लाभार्थी लाभ घेत आहेत. या योजनेत महिन्याला ५००० रुपयांपर्यंत पेन्शन मिळते. १००० रुपयांची पेन्शन ७.३४ कोटी नागरिकांना मिळते. तर ६८.७ लाख नागरिक ५००० रुपये किंवा त्यापेक्षा जास्त पेन्शन स्लॅबमध्ये येतात. जर अटल पेन्शन योजनेची रक्कम वाढवण्याचा निर्णय घेतला तर ८ कोटी नागरिकांना फायदा होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : दावोस दौऱ्यामुळे 30 लाख कोटींची गुंतवणूक - CM फडणवीस

बीडमध्ये गुंडाराज सुरूच! किरकोळ कारणावरून तरुणाला काळंनिळं होईपर्यंत मारलं

वर्सोवा कोळी फूड फेस्टिव्हल २०२६ला उद्यापासून सुरुवात, कोळी खाद्यसंस्कृतीचा भव्य उत्सव

White Dress: प्रजासत्ताक दिनी ट्राय करा 'हे' पांढऱ्या रंगाचे सुंदर आणि ट्रेंडी ड्रेस

Mayor Race : कल्याण-डोंबिवलीचा महापौर कोण? 3 नावांची चर्चा, मनसेची नगरसेविकाही शर्यतीत आघाडीवर

SCROLL FOR NEXT