Dhanshri Shintre
एअरटेलकडे प्रीपेड आणि पोस्टपेड यूजर्ससाठी अनेक रिचार्ज प्लॅन उपलब्ध असून, विविध गरजांनुसार पर्याय दिले जातात.
दोन जणांसाठी एकाच मोबाईल प्लॅनची गरज असल्यास एअरटेलकडे आकर्षक फॅमिली प्लॅनचे पर्याय उपलब्ध आहेत.
एअरटेलचा सर्वात किफायतशीर फॅमिली प्लॅन ६९९ रुपयांपासून सुरू होतो, ज्यामध्ये दोन मोबाईल कनेक्शनचा लाभ मिळतो.
या प्लॅनमध्ये महिनाभरासाठी अमर्यादित कॉलिंग, दररोज १०० एसएमएस आणि एकूण १०५ जीबी डेटाची सुविधा दिली जाते.
या प्लॅनमध्ये मुख्य नंबरसाठी ७५ जीबी डेटा आणि अतिरिक्त यूजर्ससाठी ३० जीबी डेटा प्रदान केला जातो.
या प्लॅनसोबत सहा महिन्यांचा अमेझॉन प्राइम अॅक्सेस आणि इतर अनेक अतिरिक्त सुविधा मिळतात.
या प्लॅनमध्ये गुगल वनअंतर्गत १०० जीबी क्लाउड स्टोरेज मिळते आणि परप्लेक्सिटी प्रो एआयचा अॅक्सेसही प्रदान केला जातो.
या प्लॅनमध्ये एक वर्षाचे JioHotstar मोबाईल सबस्क्रिप्शन आणि एअरटेल एक्सस्ट्रीम प्ले प्रीमियमचा लाभ मिळतो.
दोन यूजर्ससाठी उपयुक्त हा एअरटेल प्लॅन कॉलिंग, डेटा, एसएमएससोबतच अनेक प्रीमियम सेवा आणि अतिरिक्त लाभ प्रदान करतो.