Union Budget 2026
Union Budget 2026Saam Tv

Union Budget 2026: यंदा देशाचा अर्थसंकल्प कधी सादर होणार? वाचा तारीख आणि वेळ

When Will Union Budget 2026 Present By Nirmala Sitaraman: नवीन वर्षात देशाचं नवीन अर्थसंकल्प सादर केलं जाईल. यंदा अर्थसंकल्प कधी सादर होणार ते जाणून घ्या.
Published on
Summary

आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी अर्थसंकल्प कधी सादर होणार?

१ फेब्रुवारीला रविवारी अर्थसंकल्प सादर होणार?

अर्थसंकल्पीय अधिवेशनाची तारीख आणि संपूर्ण माहिती

नवीन वर्ष सुरु झाले आहे. नवीन वर्ष सुरु होताच सर्वांचेच लक्ष देशाच्या अर्थसंकल्पाकडे लागते. देशाचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सर्वसामान्यांना काय फायदा होणार याकडे सर्वांचेच लक्ष असते. देशाचे अर्थसंकल्प दरवर्षी जाहीर होते. या वर्षीदेखील २०२६-२७ साठी अर्थसंकल्प सादर होणार आहे. आर्थिक वर्ष २०२६-२७साठी अर्थसंकल्प कधी सादर होणार असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे.

Union Budget 2026
EPFO: जुन्या कंपनीची गरज नाही! नोकरी बदलल्यावर आपोआप होणार PF ट्रान्सफर; EPFO चा महत्त्वाचा निर्णय

अर्थसंकल्प कधी सादर होणार? (When Will Budget 2026 will Prensent by Nirmala Sitaraman)

दरवर्षी अर्थसंकल्प १ फेब्रुवारी रोजी सादर केला जातो. यावर्षीदेखील १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर होण्याची शक्यता आहे परंतु १ फेब्रुवारी रोजी रविवार येत आहे. त्यामुळे या दिवशी अर्थसंकल्प सादर होणार की नाही असा संभ्रम सर्वांच्याच मनात निर्माण झाला आहे. दरम्यान,याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. लवकरच याबाबत घोषणा केली जाईल.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संसदेत अर्थसंकल्पीय अधिवेशन २८ जानेवारीपासून सुरु होईल. त्यानंतर १ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर केला जाईल.दरम्यान १ फेब्रुवारी रोजी गुरु रविदास जयंतीनिमित्त अनेक राज्यांमध्ये सुट्टी असणार आहे. त्यामुळे अर्थसंकल्प सादर होणार की नाही याबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. परंतु २०१७ पासून दरवर्षी १ फेब्रुवारीलाच अर्थसंकल्प सादर करतात. मागच्या वर्षी शनिवारी अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. त्यामुळे याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

Union Budget 2026
Pension Schemes: ज्येष्ठ नागरिकांसाठी ५ जबरदस्त योजना! दर महिन्याला मिळणार पेन्शन; वाचा सविस्तर

कसं असणार अर्थसंकल्पीय अधिवेशन? (When Will Buget Session 2026 Started)

अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन टप्प्यांमध्ये असणार आहे. २८ ते १३ जानेवारीपर्यंत पहिला टप्पा तर दुसरा टप्पा ९ मार्च ते २ एप्रिलपर्यंत असणार आहे. १ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता अर्थसंकल्प सादर करण्याची परंपरा आहे. अर्थमंत्री निर्मला सितारामन आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी अर्थसंकल्प सादर करतील.

Union Budget 2026
Budget 2026: करदात्यांना पुन्हा दिलासा मिळणार! अर्थसंकल्पाकडून मध्यमवर्गीयांना काय अपेक्षा? वाचा सविस्तर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com