Gold Silver Today Rate Saam Tv
बिझनेस

Gold Rate Today: गुड न्यूज! सोनं १२००० रुपयांनी झालं स्वस्त, 18K, 22K आणि 24K चे आजचे दर किती?

Gold-Silver Price Today: सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आज सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली. सोनं १२००० रुपयांनी आणि चांदी ५००० रुपयांनी स्वस्त झाली. खरेदीला जाण्यापूर्वी वाचा आजचे दर...

Priya More

Summary -

  • सोन्याच्या दरात सलग चौथ्या दिवशी मोठी घसरण

  • २४ कॅरेट १० तोळा सोनं १२,००० रुपयांनी स्वस्त

  • २२ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दरातही घसरण

  • आज चांदी देखील स्वस्त झाली

Gold Silver Rate Today: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सोन्याच्या दरामध्ये सलग चौथ्या दिवशी मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे आज सोनं खरेदीची चांगली संधी आहे. आज २४ कॅरेटचे १० तोळा सोनं १२००० रुपयांनी स्वस्त झालं आहे. २४ कॅरेटसोबतच २२ आणि १८ कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील मोठी घसरण झाली आहे. आज चांदी देखील स्वस्त झाली आहे. १ ग्रॅम चांदीमागे ५ रुपयांची घसरण झाली. आज सोनं आणि चांदी खरेदी करायला जाण्यापूर्वी ताजे दर किती आहेत ते वाचून जा...

गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, आज २४ कॅरेट सोन्याचे दर घसरले. २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्यामागे १२०० रुपयांची घसरण झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला १,५३,५५० रुपये खर्च करावे लागेल. हे सोनं बुधवारी १,५४,७५० रुपयांना विकले गेले. तर २४ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये १२००० रुपयांची घसरण झाली. हे सोनं आज खरेदी करताना तुम्हाला १५,३५,५०० रुपये खर्च करावे लागतील. बुधवारी हे सोन् १५,४७,५०० रुपयांना विकले गेले.

२२ कॅरेट सोन्याच्या दरात देखील चांगलीच घसरण झाली आहे. आज २२ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये १,१०० रुपयांनी घसरण झाली. हे सोनं खरेदीसाठी १,४०,७५० रुपये खर्च करावे लागतील. बुधवारी हे सोनं १,४१,८५० रुपयांना विकले गेले. तर २२ कॅरेटचे १० तोळा सोनं ११,००० रुपयांनी स्वस्त झालं. हे सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला १४,०७,५०० रुपये खर्च करावे लागतली. तर बुधवारी हे सोनं १४,१८,५०० रुपयांना विकले गेले.

२४ आणी २२ कॅरेटपाठोपाठ १८ कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. २२ कॅरेटचे १ तोळा सोनं ९०० रुपयांनी स्वस्त झालं. हे सोनं खरेदीसाठी तुम्हाला १,१५,१६० रुपये खर्च करावे लागतील. तर २२ कॅरेटचे १० तोळा सोनं ९००० रुपयांनी स्वस्त झालं. हे सोनं खरेदीसाठी तुम्हाला ११,५१,६०० रुपये मोजावे लागतील. बुधवारी हे सोनं ११,६०, ६०० रुपयांना विकले गेले.

दरम्यान, सोन्यासोबतच आज चांदीच्या दरात देखील घसरण झाली आहे. त्यामुळे आज तुम्ही सोन्यासोबत चांदी देखील खरेदी करू शकता. आज १ ग्रॅम चांदी ५ रुपयांनी स्वस्त झाली असून खरेदीसाठी २६० रुपये खर्च करावे लागतील. तर आज १ किलो चांदीच्या दरामध्ये ५००० रुपयांची घसरण झाली आहे. १ किलो चांदी खरेदीसाठी २,६०,००० रुपये खर्च करावे लागतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात मनसेचे आंदोलन

Kalyan: छातीत दुखू लागल्याने १०८ ला कॉल केला, पण रुग्णवाहिकेला ४० मिनिटं उशिर; तोपर्यंत रुग्णाचा मृत्यू, कल्याणमधील संतापजनक घटना

Rupali Bhosle Photos: 'अवखळ हासरी, अल्लड लाजरी; दिसते चंद्राची कोर साजरी...' रूपालीचं देखणं रूप

West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये राडा! मतदानादरम्यान दोन गट आपापसात भिडले, नेत्याच्या गाडीवर तुफान दगडफेक; पोलिसांकडून लाठीचार्च

Hair Care: हेअर बोटॉक्स करायचा विचार करताय? मग जाणून घ्या ३ महिन्यांनंतर होणारे साइड इफेक्ट्स

SCROLL FOR NEXT